शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांकडेही वादाचा आखाडा

By admin | Updated: July 10, 2015 01:09 IST

इचलकरंजी पालिका सभा : पक्षप्रतोद-नगराध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक; परस्परांवर धावून जाण्याचा प्रकार

इचलकरंजी : नगरपालिकेच्या सभागृहातील अभूतपूर्व गोंधळानंतर नगराध्यक्षांच्या कार्यालयात सुद्धा शाब्दिक वादातून आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले. कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील व नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यात चकमक उडाली. नगरसेवकांमध्ये परस्परांवर धावून जाण्याच्या प्रकाराबरोबर धक्काबुक्की झाली. अशा गोंधळातच मुख्याधिकारी सुनील पवार यांना पोलीस संरक्षणामध्ये बाहेर जावे लागले.नगरपालिकेच्या सभागृहामध्ये विशेष सभा झाल्यानंतर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना नियमबाह्य कामकाज करीत असल्याचा जाब कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी विचारला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना विचारलेल्या प्रश्नांना परस्पर उत्तरे दिली. यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील व नगरसेवक शशांक बावचकर यांनी सभेच्या विषय पत्रिकेवरील १५ क्रमांकाच्या विषयापासून पुढे पुन्हा सभा घ्यावी, असा आग्रह धरला. मात्र, ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव व नगराध्यक्षा बिरंजे यांनी सभा नियमांनुसारच झाली असल्याचे ठामपणे सांगितले, तर गुंठेवारी विकास व आरक्षणाचा विषय पुढील सभेमध्ये घेण्याचा निर्णय केल्याचे स्पष्ट केले.यावेळी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद पाटील, बावचकर, ‘शविआ’चे गटनेते महादेव गौड, विठ्ठल चोपडे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. मदन झोरे व पाटील परस्परांवर धावून गेल्यामुळे पुन्हा गोंधळ उडाला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मुख्याधिकारी पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडील बैठकीस जायचे असल्याने त्यांना संरक्षण देऊन नगराध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर काढले.सभागृहामध्ये झालेल्या गोंधळातच काही महत्त्वाचे आणि नागरी हिताचे विषय मंजूर केल्याबद्दल सुनील पाटील यांनी नगराध्यक्षा बिरंजे यांना जाब विचारला. त्यावेळी पाटील बोलण्याच्या ओघामध्ये सभागृहातून तुम्ही पळून गेला, अशी नगराध्यक्षांवर टीका केली. त्यावर संतप्त झालेल्या नगराध्यक्षा बिरंजे यांनी, मी पळ काढला नाही. मात्र, नियमानुसार सभा पूर्ण केली आहे. याउपर तुम्हाला कलगीतुरा करायचा असेल, तर केव्हाही जाहीर चौकात या, असे आव्हान दिले. यावेळी मात्र उपस्थित असलेल्या दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी हस्तक्षेप करून सुनील पाटील यांना नगराध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर नेले. बिरंजे, मोरबाळे यांच्यावर कारवाईउपनगराध्यक्षांच्या कार्यालयात सुनील पाटील यांनी, ‘आयजीएम’च्या विषयावर नगराध्यक्षा बिरंजे व नगरसेविका सुनीता मोरबाळे यांनी तटस्थ भूमिका घेतली असल्याबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.मुख्याधिकाऱ्यांना घेरावइचलकरंजी : सभा पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांना घेराव घातला. त्याला शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांमध्ये वादावादी होऊन गोंधळ उडाला, तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांभोवती कडे करीत त्यांना सभागृहाबाहेर काढले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या वाहनासमोर कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील आडवे पडले आणि सभापती रवी रजपुते यांनी ठिय्या मारला.नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी सभा संपवून सभागृह सोडले; पण कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्वच नगरसेवकांना सभागृहामध्ये बसण्याचे आवाहन केले. उपनगराध्यक्ष रणजित जाधव हे नगराध्यक्षांच्या खुर्चीत जाऊन बसले आणि त्यांनी पुन्हा सभा सुरू होईल, असे जाहीर केले. यावेळी सभागृहातून बाहेर जाणाऱ्या मुख्याधिकारी सुनील पवार यांना दोन्ही कॉँग्रेसचे नगरसेवक सुनील पाटील, रवींद्र माने, बाळासाहेब कलागते, रणजित जाधव, भाऊसाहेब आवळे, शशांक बावचकर, रवी रजपुते, रत्नप्रभा भागवत, आदींनी घेराव घातला. सभा पुन्हा सुरू करावी आणि घाईगडबडीने फक्त विषय क्रमांक घोषित करून संपविलेल्या सभेचे कामकाज पुढे चालू ठेवावे, असा आग्रह मुख्याधिकाऱ्यांकडे धरला. मात्र, नगराध्यक्षांनी सभा संपविल्याने आम्हाला सभागृहात हलता येणार नाही, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक त्याठिकाणी आल्यामुळे पुन्हा दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांमध्ये वादावादी झाली.या उडालेल्या गोंधळामध्येच शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी पवार यांना सभा संपल्यामुळे तुम्ही बाहेर चला, असा आग्रह धरला. मात्र, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर पडण्याचा मार्ग रोखून धरल्याने गोंधळात अधिकच भर पडली. अखेर सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन मुख्याधिकाऱ्यांभोवती कडे केले आणि त्यांना सभागृहाबाहेर घेऊन गेले. इकडे सभागृहाबाहेर पडलेले कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील व सभापती रवी रजपुते यांनी धावत जाऊन मुख्याधिकाऱ्यांची गाडी रोखून धरली. पाटील हे गाडीसमोर आडवे झोपले होते तर रजपुते यांनी ठिय्या मारला होता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी गाडीत बसून जाण्याचा बेत बदलून ते पुन्हा नगरपालिकेत गेले. (प्रतिनिधी)