शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

‘रस्ते विकास’चे मूल्यांकन २५० कोटी

By admin | Updated: July 23, 2015 00:31 IST

शहरातील रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीची बैठक होत आहे. यावेळी ‘नोबल’ने केलेला मूल्यांकन अहवाल बैठकीत सादर केला जाणार आहे.

कोल्हापूर : शहरातील एकात्मिक रस्ते प्रकल्पातील दर्जाहीन कामांची किंमत वजावट न करता २५० कोटी रुपये संपूर्ण प्रकल्पाचे मूल्य होत असल्याचा अहवाल ‘नोबल इंटरेस्ट कन्सल्टन्सी इंजिनिअर्स’ने तयार केला आहे, अशी माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. ‘नोबल’ने ठरवलेल्या किमतीतून प्रकल्पातून केलेली दर्जाहीन कामे व ‘आयआरबी’ला दिलेल्या भूखंडाची बाजारभावाने किंमत वजा केल्यास प्रकल्पाची किंमत १५० कोटींपेक्षा कमी होणार आहे. या सर्व मुद्द्यावर आज, गुरुवारी ‘एमएसआरडीसी’च्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.आज महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)च्या मुंबईतील कार्यालयात शहरातील रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीची बैठक होत आहे. यावेळी ‘नोबल’ने केलेला मूल्यांकन अहवाल बैठकीत सादर केला जाणार आहे. ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.महापालिकेने ‘आयआरबी’ला टेंबलाईवाडी येथे दिलेल्या भूखंडाची किंमत ७५ कोटी रुपये होते. यासाठी खास दोन एफएसआय देण्यात आले आहेत. त्यामुळे यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. करारानुसार अपूर्ण चौक सुशोभीकरण, बस स्टॉप, युटिलिटी शिफ्टिंग, क ाँक्रिटच्या रस्त्याला गेलेले तडे, अर्धवट पदपथ व पथदिवे, अपूर्ण गटारी, आदी कामांची किंमत अहवालातून वजा करण्यात येणार आहे. ही सर्व वजावट केल्यास प्रकल्पाची किंमत १५० कोटींपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींवर मुंबईतील बैठकीत चर्चा व निर्णय होणार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)