पर्यावरण दिन विशेष: कोल्हापुरात वृक्षप्रेमींनी पाच एकरात फुलवली वनराई, लोकवर्गणीतून झाडांचे संवर्धन

By संदीप आडनाईक | Updated: June 5, 2025 12:14 IST2025-06-05T12:12:45+5:302025-06-05T12:14:11+5:30

पोलिसप्रमुखांनी जागा उपलब्ध करून दिली

Environment Day Special Tree lovers planted a forest on five acres in Kolhapur, conservation of trees through public donations | पर्यावरण दिन विशेष: कोल्हापुरात वृक्षप्रेमींनी पाच एकरात फुलवली वनराई, लोकवर्गणीतून झाडांचे संवर्धन

छाया-नसीर अत्तार

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरातील गोळीबार वृक्षप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या अडीच वर्षांपासून गोळीबार मैदानातील सुमारे पाच एकर जागेवर दुर्मीळ, अतिदुर्मीळ, फळ आणि विविध फुलझाडांची वनराई फुलवली आहे. त्यांनी लोकवर्गणीतून विविध साडेसातशेपेक्षा अधिक झाडांचे हे वृक्षवैभव जपलेले आहे.

येथील शिवशंभू कॉलनीतील नागरिक, लहान मुले तसेच ग्रुपचे सदस्य नियमित देखभाल आणि पाणी घालण्यासाठी या झाडांची जबाबदारी घेतात. कोणाचा वाढदिवस, तर मृत व्यक्तीच्या आठवणीसाठी रोप लावले जाते. यासाठी पोलिसप्रमुखांनी जागा उपलब्ध करून दिली आहे.

ही आहेत झाडे : वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, आंबा, रामफळ, सीताफळ, काजू, कडुलिंब, लिंबू पांगिरा, परस पिंपळ, रातराणी, सप्तपर्णी, रुद्राक्ष, बेल, ताह्मण, कैलासपती, सोनचाफा, लाल चाफा, सागवान, कदंब, फणस, पारिजातक, भद्राक्ष, पळस, तुळस, पांढरा चाफा, नीलमोहर, गुलमोहोर, अर्जुन, डाळिंब, चिक्कू, पेरू, बदाम, शीशम, सौदंड, रक्तचंदन, करंजी, कांचन, बहावा, मोर आवळा, बांबू, अजान वृक्ष, चिंच, नारळ, पपई, मलबारी सुपारी, लाल बॉटल ब्रश, रेन ट्री. याशिवाय विविध मसाला वनस्पती, झुडूपवर्गीय, वेलवर्गीय वनस्पती येथे आहेत.

Web Title: Environment Day Special Tree lovers planted a forest on five acres in Kolhapur, conservation of trees through public donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.