शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश, कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:02 IST

कोल्हापूर : उद्धवसेनेचा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पण त्यांना राष्ट्रवादीतूनच विरोध होऊ लागला ...

कोल्हापूर : उद्धवसेनेचा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पण त्यांना राष्ट्रवादीतूनच विरोध होऊ लागला असून, पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन तशा भावना कळविल्या आहेत.राज्यात महायुतीने एकहाती सत्ता मिळविल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उद्धवसेनेतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत चलबिचल सुरू आहे. त्यातून आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करून आपले राजकीय पुर्नवसन होते का, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच कोल्हापूर शहरातील उद्धवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने थेट मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन पक्षात घेण्याबाबत विनंती केल्याचे समजते.महापालिकेच्या राजकारणात मुश्रीफ व या पदाधिकाऱ्याचे चांगले संबंध आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. पण त्यांना पक्षात घेण्यास काही माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे. संबंधिताला पक्षात प्रवेश दिला तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिल्याचे समजते.

जिल्हाध्यक्षपदासाठी आग्रही..या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबरोबर आपणाला जिल्हाध्यक्ष पद द्यावे, अशी मागणी केल्याचे समजते. उद्धवसेनेत तीन जिल्हाप्रमुख आहेत, त्याप्रमाणे तीन तालुक्यांचा जिल्हाध्यक्ष करा, असा त्यांचा आग्रह आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार