शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी बैठकांचाच जोर

By admin | Updated: November 14, 2014 00:37 IST

नगरोत्थान योजना : प्रत्यक्ष अंमल कधी होणार ? कामाच्या नियोजनासाठी तिसऱ्यांदा बैठक

कोल्हापूर : शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी रखडलेली १०८ कोटींची नगरोत्थान योजना पुन्हा सुरू होत आहे. इतर शासकीय निधीतून १५०हून अधिक लहान-मोठ्या रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीचे नियोजन महापालिकेने केले आहे. रस्त्यांच्या नियोजनासाठी आयुक्त, शहर अभियंता व आता महापौरांच्या दरबारात बैठकीच्या फेऱ्या होत आहेत; मात्र कागदावरील रस्त्यांचे नियोजन प्रत्यक्षात कधी येणार व केलेले काम दर्जेदार होणार काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शहरातील नगरोत्थान योजनेतून ३९ किलोमीटर व इतर शासकीय योजनेअंतर्गत १५० रस्त्यांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्यक्षात १० नोव्हेंबरपासून सुरू होणारे हे काम अद्याप कागदावरच आहे. आठ दिवसांत रस्ते चकाचक करण्यास सुरुवात होईल, ही घोषणा वल्गनाच ठरली आहे. दर्जेदार रस्त्यांसाठी सभागृहाने आणाभाका घेतल्या, प्रशासनाने अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाईचा इशारा दिला. आयुक्तांनी तर रस्त्यांच्या कामात चिरीमिरीसाठी आडवे येणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात शाहूपुरीतील पहिल्याच रस्त्याचे काम चिरीमिरीत अडकले. नियोजन, इशारे, उद्घाटनांचा ‘शो’ यात अडकलेले शहरातील रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू कधी होणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.रस्त्यांच्या कामासाठी निकष व वेळेची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. वेळेत व दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेऊनही तांत्रिक प्रक्रियेत अनेक रस्ते अडकल्याचे चित्र आहे. निधीची तरतूद असूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला नगरोत्थान प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. उपशहर अभियंता एम. एम. निर्मळे यांनी दिलेला दिवाळीचा मुहूर्तही टळला आहे. कोटीचा निधी येऊन चार वर्षे होत आली तरीही निव्वळ नियोजनातील ढिलाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)