शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुका कोरोनामुक्तीसाठी तपासण्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. अ‍ॅंंटिजन व आरटीपीसीआर तपासण्यांवर प्रशासकीय ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. अ‍ॅंंटिजन व आरटीपीसीआर तपासण्यांवर प्रशासकीय पातळीवर भर दिला जात आहे. विविध उपाययोजना राबवूनही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही थांबलेला नाही. त्यामुळे आणखी तपासण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. तपासण्या वाढविण्यात आल्याने छुपे रुग्ण मिळून येत आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून शिरोळ तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. एप्रिल, मे महिन्यापेक्षा जून महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होईल, असे प्रशासनाला वाटत असताना ग्रामीण भागात जवळपास सतराहून अधिक गावात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. नांदणी, दानोळी, धरणगुत्ती, अब्दुललाट, कवठेगुलंद, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या ठिकाणीही रुग्ण वाढत आहेत.

जयसिंगपूर शहरात दररोज पंधरा ते वीस रुग्ण आढळून येत आहेत. तरीदेखील मला काय होतंय या भावनेतून अनेकजण विनामास्क फिरताना दिसून येतात. पोलीस व पालिका प्रशासनाच्या पथकाकडून दंडात्मक कारवाईदेखील सुरू आहे. जयसिंगपूर, कुरुंदवाड व शिरोळमध्ये स्वॅब तपासणी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणेकडून शासकीय, निमशासकीय बँका, सहकारी संस्था, व्यापारी, फळ-भाजी विक्रेतेशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची ॲंटिजन बरोबरच आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणखी तपासण्यांवर भर देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. आणखी तीन ते चार दिवस या तपासण्या केल्या जाणार आहेत.

चौकट : तिसरी लाट थोपवायची असेल तर शिस्त पाळा

सध्या कोरोनाची दुसरी लाट अजूनही थांबायला तयार नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची भीती लागून राहिली आहे. बेशिस्त वर्तनामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर मास्क वापरा व इतर आवश्यक शिस्त पाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.