कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन मॉकड्रिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:04 IST2025-06-30T12:04:46+5:302025-06-30T12:04:57+5:30

यावेळी आपत्कालीन संदेश वहन प्रणाली, विविध विभागांतील समन्वय आणि जलद प्रतिसाद क्षमतेची चाचपणी करण्यात आली

Emergency mock drill at Kolhapur airport | कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन मॉकड्रिल 

कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन मॉकड्रिल 

गोकुळ शिरगाव : अलाहाबाद येथे नुकत्याच झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरविमानतळावर रविवारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेचे मॉकड्रिल यशस्वीपणे पार पडले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रात्यक्षिकांत काल्पनिक विमान अपघाताच्या परिस्थितीची निर्मिती करून तातडीचे मदत व बचावकार्य राबविण्यात आले. त्यात अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस, आरोग्यविभाग आणि विमानतळ सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते.

मॉकड्रिलमध्ये आगीवर नियंत्रण मिळवणे, जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत पुरवणे, प्रवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे यांसारख्या कृतींचा समावेश होता. यावेळी आपत्कालीन संदेश वहन प्रणाली, विविध विभागांतील समन्वय आणि जलद प्रतिसाद क्षमतेची चाचपणी करण्यात आली.

या मॉकड्रिलचा उद्देश संभाव्य संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची तयारी सुनिश्चित करणे हा होता. भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता याव्यात यासाठी हे प्रात्यक्षिक राबवण्यात आले. — अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ

Web Title: Emergency mock drill at Kolhapur airport