शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

'देगलूर पॅटर्न'वर ठरणार कोल्हापूर पोटनिवडणुकीचे 'उत्तर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:11 IST

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची जोरदार चर्चा.

विश्वास पाटीलकोल्हापूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदार संघाबाबत भाजपने जी रणनीती वापरली, तीच रणनीती कायम ठेवल्यास कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक होऊ शकते, असे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. निकाल काही लागो, परंतु मतदारसंघातील पाया मजबूत करायचा असेल तर निवडणूक लढवली पाहिजे, असा विचार देगलूरची पोटनिवडणूक लढविताना झाला. भाजपच्या उमेदवारास ६६ हजार ९७४ मते मिळाली व ज्या मतदारसंघातून कमळ चिन्ह मतपत्रिकेवरून पुसले गेले होते, तिथे भाजप आता दुसऱ्या स्थानावर आला.कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार यासंबंधीची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे. भाजपने अजूनही अधिकृत कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही. डॉ. प्रज्ञा सातव यांना भाजपने बिनविरोध निवडून दिले. ही जागा आमदारांतून निवडून द्यावयाची होती. तिथे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे तो निकष येथे लागू होत नाही. नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचेच आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने गेल्या महिन्यात तिथे पोटनिवडणूक झाली. अंतापूरकर हे अनुसूचित जातीतील असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव पुढे आला होता.परंतु, या मतदारसंघात मागील तीन निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली. तिथे भाजपला स्थानच नव्हते. त्यामुळे ही निवडणूक लढविल्यास पक्षाचा पाया भक्कम होईल असा विचार पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर झाला. निकाल काही लागायचा तो लागू दे, परंतु निवडणूक लढवावी असा निर्णय झाला. पक्षाने तिथे शिवसेनेचेच माजी आमदार सुभाष साबणे यांना रात्रीत भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली व त्यांनी चांगली लढत दिली. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले तरी आता तिथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष सुरू झाला असून, शिवसेना मात्र चित्रातून बाजूला फेकली गेली आहे. आगामी विधानसभेचा विचार करता भाजपला असेच राजकारण अपेक्षित आहे.पाचवेळी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत - जी स्थिती देगलूरमध्ये होती, तशीच कोल्हापूर उत्तरमध्येही आहे. येथेही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत मागील पाच निवडणुकीत झाली आहे. फक्त २०१४ मध्येच या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवून महेश जाधव यांनी ४० हजार मते घेतली आहेत.- हा पक्षाचा करिष्मा आहे. आता शिवेसना हा राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेसची उमेदवारी जयश्री जाधव यांना मिळाल्यास त्या पक्षाचा उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता कमी आहे.जानेवारी अखेरीस निवडणूक शक्य.. आमदार जाधव यांचे निधन झाले असून, विधानसभेची कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने विधिमंडळाकडे ३ डिसेंबरला पाठविला आहे. विधिमंडळ आता अधिसूचना काढून केंद्रीय निवडणूक आयोगास ते कळवते. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब व उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासोबत जानेवारीच्या अखेरीस ही निवडणूक होण्याची शक्यता आयोगाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा