शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांची निवडणूक लांबणीवर ?

By admin | Updated: November 27, 2015 00:13 IST

जिल्ह्यातील नगरपालिका : विधानपरिषद सदस्य निवडणूक आचारसंहितेचा परिणाम, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक शक्य

राजाराम पाटील-- इचलकरंजी -विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, याच दरम्यान जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये होणारी विविध विषय समित्यांची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. परिणामी २२ डिसेंबरला या विषय समित्यांचा कालावधी संपुष्टात येत असला तरी या निवडी जानेवारी २०१६ मधील पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.नगरपालिकांची निवडणूक डिसेंबर २०११ मध्ये झाली. नऊपैकी इचलकरंजी सर्वांत मोठी पालिका असल्याने येथे बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि महिला व बालकल्याण अशा पाच समित्या स्वतंत्ररीत्या कार्यरत आहेत. थोड्याफार फरकाने अशाच समित्या अन्य नगरपालिकांकडेसुद्धा कार्यरत आहेत. या पालिकांकडे या समित्या २१ डिसेंबर रोजी अस्तित्वात आल्या असून, त्यांचा कालावधी एक वर्षाचा आहे. सध्याच्या समित्यांचा कालावधी २१ डिसेंबर रोजी पूर्ण होत असल्याने त्यापूर्वीच नवीन विषय समित्या अस्तित्वात येणे आवश्यक आहे. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषद सदस्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी पालिकांच्या सदस्यांचे मतदान असल्याने याच मतदारांसाठी विविध विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार का, याची शंका उपस्थित केली जात आहे. विधानपरिषद सदस्याच्या निवडणुकीची आचारसंहिता ३१ डिसेंबरपूर्वी संपुष्टात येते. त्यानंतरच नगरपरिषद विषय समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. या निवडणुकीसाठी संबंधित नगरपालिकांमध्ये नगरसेवकांची विशेष सभा बोलाविण्यासाठी त्यांना विषयपत्रिका लागू करण्याचा कालावधी किमान तीन दिवसांचा असणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपरिषदांच्या विषय समित्यांची निवडणूक ४ किंवा ५ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे नगराध्यक्षसुद्धा बांधीलविषय समित्यांची पदे रिक्त राहिल्यास त्याचे अधिकार आपोआपच नगराध्यक्षांना जातात. असा कायदा असला तरी डिसेंबर महिनाअखेरपर्यंत विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे या कालावधीत नगराध्यक्षांना संबंधित विषय समित्यांच्या बाबतीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.