कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:14 IST2022-03-03T15:11:34+5:302022-03-03T15:14:30+5:30

आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी

Elderly prisoner injured in Kalamba jail clash | कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात किरकोळ कारणांवरून कैद्यांच्यात झालेल्या हाणामारीत वृद्ध कैदी जखमी झाला. सुरेश कचरू वैती (वय ७०) असे जखमी कैद्याचे नाव आहे, तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा कारागृहात दोन दिवसांपूर्वी कैदी टीव्ही पहात बसले होते. त्यावेळी आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून खुनाच्या गुन्ह्यातील संशयित कैदी दस्तगीर गफूर शहा याच्या सांगण्यावरून बैतुल अब्दुल शेख हा कैदी सर्कल नंबर ६ जवळ गेला. त्याने मातीत पडलेला काचेचा तुकडा घेऊन वयस्कर असलेला कैदी सुरेश वैती याच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात हाताला काच लागल्याने सुरेश वैती हा कैदी जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या वादावादीप्रकरणी कारागृहातील प्रकाश शिवाजीराव लोमटे या सुरक्षा अधिकाऱ्याने तक्रार दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बैतुल शेख व दस्तगीर शहा या दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Elderly prisoner injured in Kalamba jail clash