शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

पोलिसांच्या हातांवर आठ वर्षांत १७ आरोपींची तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:30 AM

कोल्हापूर : गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १७ आरोपी हे पोलीस कोठडी, न्यायालय आवार, मध्यवर्ती बसस्थानक आवार, सीपीआर आवारामधून पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोपींपैकी एकाचा इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू झाला आहे. यापूर्वी २०११ ला हुपरी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपी पळाले होते. पोलिसांच्या ...

कोल्हापूर : गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १७ आरोपी हे पोलीस कोठडी, न्यायालय आवार, मध्यवर्ती बसस्थानक आवार, सीपीआर आवारामधून पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोपींपैकी एकाचा इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू झाला आहे. यापूर्वी २०११ ला हुपरी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपी पळाले होते. पोलिसांच्या हातून लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दींतून आरोपी पलायनाच्या घटना सर्वाधिक घडल्या आहेत.शाहूवाडी पोलीस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून घरफोडी व लूटमारीच्या गुन्ह्यांतील चार आरोपींनी शुक्रवारी पहाटे पलायन केले आहे. जिल्ह्यात सध्या ३२ पोलीस ठाणी आहेत. त्यांपैकी राजारामपुरी, करवीर, शिवाजीनगर, मुरगूड, गांधीनगर, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे, कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ, शाहूपुरी, इस्पुर्ली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी आदी पोलीस ठाण्यांत कोठड्या आहेत; पण शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस कोठड्या मर्यादित जागेमध्ये आहेत. सध्या कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाण्यांच्या आरोपींना राजारामपुरी व करवीर पोलीस ठाण्यांत ठेवण्यात येते. शहरामध्ये असणारी करवीर महिला पोलीस कोठडीची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे महिला आरोपींना राजारामपुरी व मुरगूड पोलीस ठाण्यांत न्यावे लागते. बहुतांश आरोपी हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील होते. दरम्यान, पलायन केलेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांपैकी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवरून उडी मारलेल्या आरोपीचा मृत्यू झाला आहे.पलायन केलेले आरोपी असे२०१० : मुरगूड (शौचालयाला नेत असताना)२०११ : हुपरी (पोलीस ठाण्याच्या कोठडीतून),जुना राजवाडा (बिंदू चौक सबजेलजवळून), शाहूपुरी (न्यायालयाच्या आवारातून)२०१२ : शिवाजीनगर (इचलकरंजी)२०१३ : कोडोली, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा (बालकल्याण संकुल)२०१४ : शिवाजीनगर (आरोपी पॅरोलवर असताना), पन्हाळा (न्यायालयआवारातून), कागल२०१५ : लक्ष्मीपुरी (सीपीआर आवारातून)२०१६ : लक्ष्मीपुरी (सीपीआर कैदी वॉर्डमधून), राधानगरी (न्यायालय आवारातून)२०१७ : शाहूपुरी (मध्यवर्ती बसस्थानक प्रवास करताना), लक्ष्मीपुरी (सीपीआरमधून)