शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आठ टक्के महिलांना मधुमेह, उच्च रक्तदाब

By admin | Updated: April 5, 2015 00:30 IST

आरोग्य तपासणी अभियान : सर्वाधिक राधानगरी तालुक्यात रुग्ण

 भीमगोंडा देसाई / कोल्हापूर आरोग्य विभागातर्फे महिला आरोग्य अभियानांतर्गत तपासलेल्या ३० वर्षांवरील महिलांपैकी आठ टक्के महिलांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे निदान झाले. सर्वाधिक महिला राधानगरी तालुक्यातील आहेत. वेळीच निदान झाल्यामुळे संबंधितांना आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यातर्फे त्यांना उपचारांसाठी मार्गदर्शन केले जात आहे. बहुतांश महिला स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देत नाहीत. तीव्र स्वरूपाचा त्रास सुरू झाल्याशिवाय रुग्णालयाची पायरी चढण्याची मानसिकता महिलांमध्ये नसते. परिणामी उच्च रक्तदाबाचा आजार बळावल्यानंतर संबंंधित महिलेच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. मृत्यूचीही शक्यता असते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक व उपकेंद्रांतर्गत आरोग्य तपासणी अभियान घेतले. अभियानात जिल्ह्यात तीस वर्षांवरील १० हजार ७३६ महिलांची आरोग्य तपासणी झाली. यामध्ये १७६१ महिलांना मधुमेहाची लक्षणे दिसली. ६१६ जणींना मधुमेह असल्याचे निदान झाले. ३ हजार ७६२ महिलांना हृदयविकाराची लक्षणे दिसली. तपासणीनंतर ८१२ जणींना हृदयविकार असल्याचे निदान झाले. अभियानातून मोफत आरोग्य तपासणी झाल्यामुळे महिलांची ही भयावह स्थिती समोर आली. आरोग्याला अतिशय घातक असे हे दोन्ही आजार जिल्ह्यात तब्बल आठ टक्के महिलांना असल्याच्या धक्कादायक माहितीवरून महिला आपल्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष करतात, हेही स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे कधी मधुमेह आधी होतो, तर पाठोपाठ उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. काहीजणींना उच्च रक्तदाब आधी आणि नंतर मधुमेह होतो. बदललेली जीवनशैली, अतिताण, व्यायाम व सकस आहाराचा अभाव या महत्त्वाच्या कारणांमुळे दोन्ही होतात. याबद्दल माहिती असूनही परिस्थिती व अपरिहार्यता यांमुळे शरीराला अपायकारक कारणे अनेकांना टाळता येत नाहीत. मात्र वेळीच निदान होऊन उपचार सुरू झाल्यास जीविताचा धोका टाळणे शक्य आहे, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.