शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पर्वताचा कडा कोसळला... आणि काळजाचा ठोका चुकला!

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

नेपाळमधील थरकाप : गिर्यारोहणासाठी गेलेले सांगलीचे चौघे सुखरूप परतले

अंजर अथणीकर / सांगली गिर्यारोहणाचा आनंद घेत असतानाच अचानक पर्वत हलू लागला... काही कळायच्या आत एक मोठा बर्फाचा कडा विजेच्या कडकडाटासारखा आवाज करीत कोसळला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला... गाईडनेच भूकंप झाल्याचे सांगितले आणि आम्ही सर्वांनी जीव मुठीत धरून परतीचा मार्ग धरला... असे अनुभव शनिवारी दुपारी नेपाळहून सांगलीला परतलेले डॉ. सचिन उदगावे यांनी सांगितले. १५ एप्रिलरोजी सांगलीहून डॉ. उदगावे, अमोल पाटील, स्वप्नील कुंभार व त्यांच्या पत्नी मानसी कुंभार हे चौघे एव्हरेस्टवर ट्रेकिंगसाठी गेले होते. एव्हरेस्टच्या दुसऱ्या कॅम्पवर आरोग्य बिघडल्याने कुंभार दाम्पत्य मागे परतले. अमोल पाटील आणखी दोन कॅम्पवरून श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने तेही लोबोची येथील एका हॉटेलमध्ये उतरले. डॉ. उदगावे मात्र एव्हरेस्टच्या कॅम्पपर्यंत गेले. मित्र आजारी असल्यामुळे त्यांनी परतीचा मार्ग वेगाने सुरु केला. चार तासाचे अंतर केवळ दीड तासात पार करून तुघला येथे ते आले. त्यानंतरचा अनुभव सांगताना डॉ. उदगावे म्हणाले की, येथे जगातील सर्वाच उंच स्मशानभूमी आहे. एव्हरेस्ट चढताना मृत्युमुखी पडलेल्यांना येथे पुरले जाते. याठिकाणी आलो असताना ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मला वाटले, मला चक्कर येत आहे. त्यानंतर जोरदार आवाज होऊन आम्ही चार तासापूर्वी सोडलेल्या कॅम्पवर बर्फाचा कडा कोसळला. भराभर चालत आल्यानेच मी आणि माझे सहकारी वाचलो, अन्यथा आमचे मृतदेहही सापडले नसते. देवाचे आभार मानून आम्ही परत फिरलो. मित्रांची काळजी वाटू लागली. अमोल पाटील हे ज्या हॉटेलमधून पाच तासांपूर्वी जेवण करून बाहेर पडले होते, ते हॉटेल पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. शेवटी त्याच्याशी व्हॉटस् अ‍ॅपवरून संपर्क झाल्याने खूप मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवसाचा भूकंप मात्र पूर्वकल्पना देऊन झाला होता. यावेळी आम्ही मोकळ्या मैदानात होतो. आमच्या ‘त्या’ चार दिवसात जवळपास शंभरहून अधिक भूकंप झाले. आम्ही चौघेही लोबोची येथे भेटलो. त्यानंतर परतण्यासाठी खूपच त्रास झाला. तरीही भूकंपाच्या इतक्या मोठ्या संकटातून सर्वांचे प्राण वाचल्याचे मोठे समाधान होते. त्यामुळे हे अनुभव घेऊन आम्ही सांगलीला परतलो. चार तासांपूर्वी सोडलेले हॉटेल कोसळले एव्हरेस्टवर गिर्यारोहणासाठी सांगलीचे अमोल पाटील सहकाऱ्यांसमवेत गेले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते एव्हरेस्टची मोहीम मध्येच सोडून परतले. परतीच्यावेळी रात्र झाल्याने त्यांनी फेरीच्या गावातील ‘हिमालयीन’ या हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी उठून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. सकाळी अकराच्या सुमारास भूकंप झाला आणि चार तासांपूर्वी सोडलेले हिमालयीन हॉटेल पूर्णपणे भुईसपाट झाले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी, दहा ते बाराजण गंभीर जखमी झाले. डॉ. उदगावे या ठिकाणी पोहोचले. याच ठिकाणी त्यांना अमोल पाटील येथून निघून गेल्याचे कळाले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.