corona virus-सहा महिन्यांत दीड लाख नागरिकांना ई-पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:15 IST2020-09-03T17:12:37+5:302020-09-03T17:15:22+5:30
कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यातून सुटका झाली असून आता त्यांना विभागाच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.

corona virus-सहा महिन्यांत दीड लाख नागरिकांना ई-पास
कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यातून सुटका झाली असून आता त्यांना विभागाच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.
मार्च महिन्यात केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर तातडीचे कारण असलेल्या नागरिकांना अन्य जिल्हा अथवा राज्यात जाता यावे यासाठी ई-पास सेवा सुरू करण्यात आली. आधी पोलीस प्रशासन आणि नंतर जिल्हा प्रशासनाकडे ही जबाबदारी आली तेव्हापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील दहाहून अधिक कर्मचारी या कामात गुंतले होते. सुरुवातीला काही महिने तहसीलदार संतोष कणसे तर सध्या करमणूक कर अधिकारी रंजना बिचकर यांच्याकडे ई-पास प्रमुख म्हणून ही जबाबदारी होती.
गेली सहा महिने हे काम करताना कधी एकदा या जबाबदारीतून आमची सुटका होते, अशीच येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली होती. अखेर राज्य शासनाने ३१ ऑगस्टच्या अध्यादेशात ई-पास रद्द केल्याने आता ई-पास वितरणात अडकलेले कर्मचारी त्यांच्या विभागाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकणार आहेत.
महिना मंजूर पास नामंजूर पास
- मार्च ५५२ १०२७
- एप्रिल १ हजार ६५४ २९ हजार ९३१
- मे ३० हजार ५४७ ४१ हजार ९७५
- जून ४९ हजार ९९३ ४१ हजार ४१६
- जुलै २५ हजार ९९५ ४२ हजार १२९
- ऑगस्ट ३३ हजार ६८५ २५ हजार ६४८
- सप्टेंबर ० ४ ०८
एकूण १ लाख ४२ हजार ४३० १ लाख ८२ हजार १३४