कोल्हापूर: चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. कोल्हापूर-राधानगरी रोडवर कौलव येथे आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ऐन दिवाळीतच अपघातात तिघे ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीकांत बाबासो कांबळे (तरसबळे, ता राधानगरी), दिपाली गुरुनाथ कांबळे (शेंडुर ता. कागल), पुतणी कौशिकी सचिन कांबळे अशी मृतांची नावे आहेत. तर अथर्व गुरुनाथ कांबळे (शेंडूर कागल) गंभीर जखमी झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत कांबळे हे बहिण दिपाली हिला घेवून दिवाळी सणाचा बाजार घेण्यासाठी भोगावती येथे गेले होते. बाजार करुन घरी परतताना चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने श्रीकांत यांच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत भाऊ श्रीकांत व बहिण दिपाली, पुतणी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अथर्व गंभीर जखमी झाला.
वाचा : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत पेट्रोल पंपाकडे निघाले, भरधाव एसटी बसने चिरडले; पती ठार, कळंब्यात झाला अपघातजखमी अथर्वला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला होता. अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/4141118326128841/}}}}
Web Summary : A tragic accident near Kolhapur claimed three lives. A dumper traveling in the wrong direction collided with a motorcycle, killing two siblings instantly. Two children were seriously injured and hospitalized. The dumper driver fled the scene; police are investigating.
Web Summary : कोल्हापुर के पास एक दुखद दुर्घटना में तीन लोगों की जान चली गई। गलत दिशा से आ रहे एक डंपर ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे दो सगे भाई-बहन की मौके पर ही मौत हो गई। दो बच्चे गंभीर रूप से घायल हो गए और उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया। डंपर चालक मौके से फरार हो गया; पुलिस जांच कर रही है।