पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 03:21 PM2019-09-07T15:21:56+5:302019-09-07T15:39:30+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.

Due to heavy rainfall, traffic on 4 highways and 15 major district roads is closed | पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

googlenewsNext
ठळक मुद्देपावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंदअधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.

कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्लज, कोदाळी भेडसी ते राज्य हद्दमध्ये राज्य मार्ग क्रमांक १८९ या मार्गावरील तिलारी घाटामध्ये ३0 मीटर लांबीचा रस्ता खचल्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ५ जुलै पासून बंद असून आजरा, अंबोली, सावंतवाडी मार्गे वाहतूक सुरु आहे.

पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, शिरदवाड राज्य मार्ग क्र. १९२ या मार्गावरील इचलकरंजी येथील मोठ्या पुलावरील वाहतुक बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काल सायंकाळी ७ वाजल्यापासून बंद असून पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराबाहेरील वळण रस्ता ऊजळाईवाडी रस्ता राज्य मार्ग क्रमांक १९४ मार्गावर शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर फुटभर पाणी असल्याने ३१ आॅगस्ट रोजी वाहतूक बंद झाली आहे.

करवीर तालुक्यातील कुडित्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव या प्रमुख जिल्हा मार्गावर कोगे बंधाºयावर २ फुट पाणी असल्यामुळे ३१ आॅगस्टपासून बालिंगा, दोनवडे, घानवडे मागार्ने वाहतूक सुरु आहे. आय.टी.आय. पाचगांव खेबवडे ते बाचणी प्र.जि.मा. क्र. ३0 मार्गावर खेबवडे गावाजवळ २ फूट पाणी आल्यामुळे वाहतूक बंद असून
पयार्यी मागार्ने वाहतूक सुरु आहे.

शिरोली दुमाला बाचणी प्रजिमा क्र. ३७ मार्गावर बाचणी बंधाºयावर ३ फूट पाणी असल्यामुळे पयार्यी मागार्ने वाहतूक सुरु आहे. येवती पाटी बाचणी प्रजिमा क्र. ४२ बाचणी बंधाºयावर पाणी असल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

शिरोळ तालुक्यातील अतिग्रे, शिरढोण, मजरेवाडी, टाकळी, खिद्रापूर ते जिल्हा हद्द रा.मा. २00 मार्गावर शिरढोण पुलावर ५ फुट पाणी तसेच मजरेवाडी ते अकिवाट गावाजवळ पाणी असल्याने वाहतूक बंद असून नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.

काल सकाळपासून बस्तवडे बंधाºयावर ३ फूट पाणी असल्याने कागल तालुक्यातील बिद्री-सोनाळी-बस्तवडे प्रजिमा क्र. ४६ या मार्गावरील वाहतूक बंद असून इजिमा क्र. १८९ अनुर ते बानगे व इजिमा क्र.९३ बानगे मार्गे वाहतूक सुरू आहे.

राधानगरी तालुक्यातील आरे सडोली-खालसा, राशिवडे बु.,शिरगांव प्रजिमा क्र. ३५ या मार्गावरील शिरगाव बंधाºयावर पाणी असल्याने वाहतुक बंद आहे. तारळे व राशिवडे मार्गे वाहतुक सुरु आहे. सरवडे, मालवे, तुरंबे प्रजिमा क्र. ९८ तुरंबे बंधाºयावर पाणी असल्याने वाहतुक बंद आहे. सरवडे, मुदाळ व तिट्टामार्गे वाहतुक सुरु आहे.

शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारूण उदगिरी प्र.जि.मा.क्र.१ मार्गावरील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी आल्यामुळे कालपासून वाहतूक बंद आहे. शित्तूर तुरूकवाडी मलकापूर मार्गे पयार्यी वाहतूक सुरू आहे.

माळवाडी पुलावर पाणी आल्यामुळे शाहुवाडी तालुक्यातील तुरूकवाडी कोतोली रेठरे सोंडोली खेडे शित्तूर तर्फ वारूण प्रजिमा क्र. ३ मार्गावरील कालपासून वाहतूक बंद आहे, मात्र तुरूकवाडी-कोकरूड-शेडगेवाडी-आरळा-शित्तूर मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील निलजी,नूल, येणेचवाडी,नंदनवाड प्रजिमा ८६ या मार्गावर बंधाºयावर पाणी असल्याने निलजी-नुल मार्गे वाहतूक बंद, दुंडगे-जरळी-मुंगळी-नुल मार्गे वाहतूक सुरू आहे.

गगनबावडा तालुक्यातील शेनवडे, अंदूर, धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशिवडे बु., परिते प्रजिमा क्र.३४ या मार्गावर आंदुर बंधाºयावर ३ फूट पाणी असल्यामुळे अनदुर, मणदुर, वेतवडे, बालेवाडी प्रजिमा क्र. २५ मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

परखंदळे, आकुर्डे, धुंदवडे, जर्गी गगनबावडा प्रजिमा क्र .३९ या मार्गावर गोठे पुलावर १ फूट पाणी असल्याने वाहतूक बंद आहे. मल्हारपेठ सुळे कोदवडे प्रजिमा २६ मार्गे पयार्यी वाहतूक सुरु आहे.

आजरा तालुक्यातील नवले देवकाडगांव साळगाव प्रजिमा क्र.५८ या मार्गावर साळगाव बंधाºयावर ३ फूट पाणी असल्यामुळे पयार्यी मागार्ने वाहतूक सुरु आहे.

Web Title: Due to heavy rainfall, traffic on 4 highways and 15 major district roads is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.