शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीत कडकडीत बंद

By admin | Updated: July 29, 2014 00:46 IST

येळ्ळूर प्रकरण : कर्नाटक पोलिसांबाबत संताप; कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

निपाणी : बेळगावजवळील येळ्ळूरमध्ये मराठी बांधवांवर झालेल्या कर्नाटक पोलिसांच्या दंडूकशाहीच्या निषेधार्थ निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेतर्फे आज, सोमवारी निपाणी बंद पुकारला. त्याला व्यावसायिकांसह मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला.महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेने केलेल्या अवाहनानुसार सकाळपासूनच निपाणी शहर आणि उपनगरांतील सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पोलिसांनी केलेल्या दंडूकशाहीचा निषेध केला. निपाणी परिसरातील ग्रामीण मार्गावरील सर्व बसेस दिवसभर बंद होत्या. निपाणी शहरातील रिक्षासह वडाप व्यावसायिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने नेहमी गजबजलेल्या बेळगाव नाका, गुरुवार पेठ, बसस्थानक परिसर, चिकोडी रोड, मुरगूड रोड परिसरांत शांतता होती.शहरातील सराफी बाजारपेठ, कापड दुकानदार, होलसेल दुकानदार, अडत व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी दिवसभर बंद पाळला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर निपाणीतील चौकाचौकांत पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर निपाणी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी) सांगली : येळ्ळूर येथील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. ३१) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. एवढ्यावर केंद्र सरकारला जाग आली नाही, तर रेल रोखण्यासह म्हैसाळ येथे कर्नाटकच्या बसेस रोखण्याचे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी दिला आहे. कर्नाटक पोलीस आणि तेथील सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी सांगलीत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला आहे. कर्नाटकच्या बसला काळे फासलेसातारा : कर्नाटक शासनाने सीमा भागातील नागरिकांवर केलेला अन्याय व पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे पडसाद सोमवारी साताऱ्यातही उमटले. शिवसैनिकांनी सातारा बसस्थानकात जाऊन कर्नाटकच्या बसला काळे फासून निषेधाच्या घोषणाही दिल्या. कर्नाटक शासनाने सीमा भागात दहशत पसरविली आहे. तेथील पोलिसांनी येळ्ळूर येथील फलक बंदोबस्तात काढून टाकला आहे. त्याचबरोबर तेथील नागरिकांना बेदम मारहाण केली आहे. याच्या निषेधार्थ साताऱ्यातील शिवसैनिकांनी सोमवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास सातारा बसस्थानकात जाऊन आंदोलन केले. कर्नाटक राज्याच्या मुंबई-बेळगाव बसला त्यांनी लक्ष्य केले.कर्नाटक शासनाचा इस्लामपुरात निषेधइस्लामपूर : सीमाभागातील येळ्ळूर येथील मराठी बांधवांना कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा येथील अखिल भारतीय मराठा सेवा संघ, शंभुराजे युवा क्रांती, जिजाऊ महिला क्रांती संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. तहसीलदार रूपाली सरनोबत यांना हे कर्नाटक शासनाच्या व पोलिसांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.