शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापुरातील महाद्वार रोडवर थरार, तीन महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:42 IST

नागरिकांनी कारचालकास चोपले

कोल्हापूर : गर्दीने गजबजलेल्या महाद्वार रोडवर पापाची तिकटीकडून उलट्या दिशेने घुसलेल्या मद्यधुंद कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत तीन महिलांना धडक दिली. नागरिकांनी पाठलाग करून गुजरी कॉर्नरला कार अडवली. कारमधून बाहेर ओढून कारचालक आणि त्याच्या मित्राला चोप दिला.वाहतूक पोलिसांनी वेळीच धाव घेऊन मद्यधुंद कारचालक प्रसाद दत्तात्रय सुतार (वय २९, रा. वखार भाग, सांगली) आणि त्याचा मित्र समीर अब्दुलनबी नदाफ (३०, रा. सिव्हिल चौक, सांगली) यांना ताब्यात घेतले. हा प्रकार मंगळवारी (दि. १०) रात्री आठच्या सुमारास घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एक आलिशान कार पापाची तिकटी येथून वन-वे तोडून महाद्वार रोडकडे निघाली होती. मद्यधुंद कारचालकाने प्रथम दत्त महाराज गल्लीच्या कॉर्नरला लावलेल्या चारचाकीला धडक दिली. त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर त्याने कार आणखी वेगाने पळवली. जिरगे बोळ येथून निघालेल्या दोन महिलांना धडक देऊन तो कारचालक बेफामपणे कार दामटत पुढे गेला.गुजरी कॉर्नरला वाहतूक पोलिस संतोष करनुरकर आणि मंजुनाथ बेळमकर यांनी कार अडवली. त्यानंतर कारचा पाठलाग करत आलेल्या संतप्त नागरिकांनी कारचालकाला बाहेर ओढून त्याला चोप दिला. वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद कारचालकासह त्याच्या मित्राला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ऐन गर्दीच्या वेळी भरधाव कारने वाहनांसह महिलांना धडक दिल्याने नागरिकांनी थरार अनुभवला. सुदैवाने मद्यधुंद कारचालकाला वेळीच अडवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.कारमध्ये आढळल्या दारूच्या बाटल्यागुजरी कॉर्नरला कार अडवून त्यातील दोघांना बाहेर ओढताच नागरिकांना कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. दोघेही दारूच्या नशेत असल्याचे लक्षात येताच त्यांना बेदम चोप दिला. सांगलीतील एका संघटनेचे पदाधिकारी असल्याचे दोघे सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, नागरिकांनी त्यांची यथेच्छ धुलाई केली.