कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:46 IST2019-11-26T14:44:48+5:302019-11-26T14:46:17+5:30
यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेतर्फे करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राजू यादव, विनोद खोत, बाजीराव पाटील, शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, विराज पाटील, हर्षल सुर्वे, सुरेश साळोखे, शशी बिडकर, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातून बाहेर पडण्यापूर्वीच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टीने महापूर येऊन शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यामध्ये सुमारे ७५ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकरी बाहेर पडतो न पडतो तोच आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकºयांना पुन्हा झोडपून काढले. महापूर व अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेली खरीप पिके जागेवर कुजली. यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी.
आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, विराज पाटील, हर्षल सुर्वे, बाजीराव पाटील, राजू यादव, अवधूत साळोखे, शशी बिडकर, मनजित माने, रणजित आयरेकर, धनाजी यादव, विनोद खोत, नरेश तुळशीकर, सुनील पोवार, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, सरदार तिप्पे, अभिजित बुकशेट, आदी सहभागी झाले होते.