अपघातग्रस्त कारचालकावर गुन्हा, नशेत भरधाव कार चालवून केले होते जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:48 IST2021-05-10T18:43:04+5:302021-05-10T18:48:47+5:30
Drunk And Drive Crimenews Kolhapur : मद्यप्राशन करून नशेत भरधाव कार चालवून पोलीस जीपसह एकूण पाच वाहनांना धडक देऊन महिलेस जखमी केल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. त्याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा कारचालक सचिन अशोक जिरगे (वय ४६, रा. कुसूम अपार्टमेंट, युनिक पार्क, कदमवाडी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

अपघातग्रस्त कारचालकावर गुन्हा, नशेत भरधाव कार चालवून केले होते जखमी
कोल्हापूर : मद्यप्राशन करून नशेत भरधाव कार चालवून पोलीस जीपसह एकूण पाच वाहनांना धडक देऊन महिलेस जखमी केल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. त्याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा कारचालक सचिन अशोक जिरगे (वय ४६, रा. कुसूम अपार्टमेंट, युनिक पार्क, कदमवाडी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन जिरगे याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गंगावेश ते पंचगंगा घाट या मार्गावर कार चालवून शुक्रवार गेट येथे एका दुचाकीस धडक दिल्याने त्यावरील महिला विजया सुनील मुधोळकर (रा. शुक्रवार पेठ) या जखमी झाल्या. या दुर्घटनेवेळी कारने पोलीस जीपसह आणखी तीन वाहनांना ठोकरले होते. त्याप्रकरणी कारचालक सचिन जिरगे याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.