शिरोली : टोप (ता . हातकणंगले) येथे रोड रोलर अंगावरून गेल्याने चालक मल्लाप्पा बसप्पा नाईक (वय ४० रा. पाडळी खुर्द ता करवीर) हा जागीच ठार झाला. ही घटना काल, शुक्रवारी घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, टोप हायस्कूल परिसरात खाजगी जागेत प्लॉट पाडल्याने तेथे रस्त्याच्या सपाटी करणाचे काम चालू होते. यावेळी गिअर अडकल्याने रोड रोलर बंद पडला. चालक मल्लाप्पा नाईक हे खाली उतरून रोड रोलरच्या इंजिनचा दरवाजा उघडून काय बिघाड झालाय हे पाहत होते. याचवेळी अचानक रोडरोलर सुरू होऊन पुढे गेला.यावेळी रोड रोलर थांबविण्याचा प्रयत्न करताना चालक नाईक रोलरखाली सापडले व त्यांच्या अंगावरून रोडरोलर गेला. यात ते जागीच ठार झाले. रोडरोलर पुढे जाऊन झाडावर आदळला. याघटनेने एकच खळबळ उडाली. अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा झाली.
Kolhapur: रोड रोलरखाली सापडून चालकाचा मृत्यू, बिघाड झालेला पाहायला गेला अन् घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:05 IST