शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

रंकाळ्याचे पाणी होणार पिण्यायोग्य

By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST

हायड्रो डायनॅमिक कॅव्हिटेशन तंत्रज्ञान : रसायन तंत्रज्ञान संस्थेचा पुढाकार

संतोष पाटील - कोल्हापूर -कोल्हापूरचे सुपुत्र व मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आय.सी.टी.) कुलगुरू जी. डी. यादव यांच्या प्रयत्नांमुळे रंकाळ्याचे पाणी पिण्या योग्य शुद्ध होणार आहे. आय.सी.टी.चे प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांच्या हायड्रो डायनॅमिक कॅविटेशन या तंत्रज्ञानावर आधारीत उपकरण रंकाळ्याच्या काठावर बसविण्यात येणार आहे. यासाठी लागणारा २५ लाखांचा निधी यादव यांनी सेवाभावी संस्थांकडून उपलब्ध केला आहे. महापालिका फक्त वीज व अर्धा गुंठा जागा उपलब्ध करून देणार आहे. या मोहिमेस १४ जूनपासून सुरुवात होत आहे. कुलगुरू यादव हे अर्जुनवाड (ता. राधानगरी) येथील आहेत. कोल्हापूरसाठी काहीतरी करायचे या भावनेतून त्यांनी आय.सी.टी.चे प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित रंकाळ्याचे अशुद्ध पाणी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना शुद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अडीच वर्षे पाठपुरावा के ला. प्रकल्पासाठी आवश्यक २५ लाखांचा निधी मुंबईतील आरती ग्रुपचे चंद्रकांत गोगरी, राजेंद्र गोगरी, परिमल देसाई, रत्नाकर बांदोडकर, प्रकाश पाटील यांच्याकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी (सीआरएस)च्या माध्यमातून उपलब्ध केला. यासाठी समन्वयाची जबाबदारी आय.सी.टी.कोल्हापूर माजी विद्यार्थी संघटनेचे प्रा. अमर जाधव यांनी पार पाडली आहे. प्रकल्पाचे सादरीकरण प्रा. पंडित यांच्या उपस्थितीत ६ जूनला महापालिकेत होणार आहे, तर प्रकल्पाचे उद्घाटन व सुरुवात १४ जूनला सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.असे होणार शुद्धिकरणरंकाळ्यात तब्बल ४३ लाख ५० हजार १४१ घनमीटर इतकी पाणी साठविण्याची क्षमता आहे. सरासरी २७ लाख ४५ हजार घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असतो. सुरुवातीस रंकाळ्याच्या काठावर हायड्रो डायनॅमिक कॅविटेशन रिअ‍ॅक्टर व एक पंप ठेवला जाईल. या माध्यमातून तासाला एक दशलक्ष लिटरप्रमाणे पाण्याचा उपसा करून त्याचे शुद्धिकरण करून ते पाणी पुन्हा रंकाळ्यात सोडले जाईल. रिअ‍ॅक्टरमध्ये सेकंदाच्या शंभराव्यापेक्षाहीकमी वेळेत पाणी दहा हजार अंश सेल्सियस तापमानावर गरम होऊन थंड होईल. यावेळी पाण्यातील दूषित घटक मरून जातील. यासाठी कोणतीही रासायनिक प्रक्रिया व घटकांचा वापर केला जाणार नाही. सुरुवातीस एक व त्यानंतर गरजेनुसार आवश्यक रिअ‍ॅक्टर बसविण्यात येणार आहेत. सहा ते आठ महिन्यांत पहिल्या टप्प्यात सर्व रंकाळ्यातील पाणी शुद्ध होईल. त्यानंतर गरजेनुसार दररोज काही तास ही यंत्रणा सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी दिली.प्रकल्पाची वैशिष्ट्ये३० बाय १५ फूट जागाथ्री फेज ४० एचपी वीज फक्त एक आयआटीआय फिटर कामगार चालविणार युनिटतासाला विजेचा २०० रुपये खर्चएका तासात एक दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धिकरणकोणत्याही रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर नाहीशेवाळ, हायसिंथ व इतर प्रदूषित घटकांचा पूर्णत: नाशसहा ते आठ महिन्यांत संपूर्ण तलावातील पाण्याचेशुद्धिकरण शक्यशुद्धिकरणानंतर पाणी पिण्यासह अंघोळीसाठी वापरण्यायोग्य.