डॉ. कलशेट्टी यांची बदली रद्द झालीच पाहिजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 06:03 PM2020-10-10T18:03:02+5:302020-10-10T18:07:12+5:30

Muncipal Corporation, kolhapur, commissioner आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक बदली झाली. अजून काही महिने सेवा कार्यकाळ शिल्लक असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची या प्रकारे बदली करण्यामागे कोणता हेतू असावा, असा प्रश्न सर्व कोल्हापूरकरांना पडला होता. याचेच पडसाद शनिवारी उमटले. नागरिकांनी शिवाजी चौक येथे डॉ. कलशेट्टी यांच्या बदलीविरोधात निदर्शने केली.

Dr. Kalshetti's transfer must be canceled! | डॉ. कलशेट्टी यांची बदली रद्द झालीच पाहिजे !

डॉ. कलशेट्टी यांची बदली रद्द झालीच पाहिजे !

Next
ठळक मुद्देनागरिकांची शिवाजी चौकात निदर्शने आयुक्तसाहेब, परत या!च्या घोषणा

कोल्हापूर : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक बदली झाली. अजून काही महिने सेवा कार्यकाळ शिल्लक असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची या प्रकारे बदली करण्यामागे कोणता हेतू असावा, असा प्रश्न सर्व कोल्हापूरकरांना पडला होता. याचेच पडसाद शनिवारी उमटले. नागरिकांनी शिवाजी चौक येथे डॉ. कलशेट्टी यांच्या बदलीविरोधात निदर्शने केली.

यावेळी आयुक्तसाहेब, परत या, रंकाळ्याला तुमची गरज आहे, पंचगंगेला तुमची गरज आहे, कोल्हापूरला तुमची गरज आहे! अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

आयुक्तांची बदली करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो,आयुक्तांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. आयुक्तसाहेब, कम बॅक, कोल्हापूर लव्ह आयुक्त अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.

यावेळी संदीप देसाई, गिरीश फोंडे, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, गीता हसूरकर, अमरजा पाटील, सूरज सुर्वे, रूपेश पाटील, अमोल बुड्डे, मोईन मोकशी, लखन काझी, संपदा मुळेकर, गीता डोंबे, अवधूत भाटे, संजय साडविलकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Kalshetti's transfer must be canceled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.