शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

डॉ. दीपा फिरकेंना खोट्या प्रमाणपत्राद्वारे दिली पदोन्नती, वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार उघड

By समीर देशपांडे | Updated: November 8, 2023 13:34 IST

वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्रालयातील आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे गेली पाच वर्षे हे प्रकरण दडपण्यात यश आले

समीर देशपांडेकोल्हापूर : अनुभवाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. दीपा फिरके यांनी पदोन्नती मिळवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्रालयातील आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे गेली पाच वर्षे हे प्रकरण दडपण्यात यश आले. मात्र, नवे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी डॉ. फिरके यांच्याविरेाधात अहवाल दिला आहे.ज्या प्रकरणामध्ये संबंधित डॉक्टरांना निलंबित केले जाऊ शकते. त्यांना उलट पदोन्नती देण्याचा ‘उफराटा’ न्याय या खात्याने राबवला आहे. डॉ. दीपा शांताराम गडकरी ऊर्फ डॉ. दीपा सचिन फिरके यांची २४ नोव्हेंबर २०११ रोजी बालरोग चिकित्सा विभागाकडे सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांची मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे आणि नंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे बदली झाली. सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याबाबतच्या प्रक्रियेदरम्यान याच विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता कुंभोजकर यांनी पहिल्यांदा डॉ. फिरके यांच्या अनुभवाच्या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करून ही बाब विभागप्रमुख डॉ .सुधीर सरवदे यांच्या १८ डिसेंबर २०१८ रोजी लक्षात आणून दिली. डॉ. फिरके या चुकीच्या अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती मिळवतील आणि आपण या लाभापासून वंचित राहू या भीतीने त्यांनी ही तक्रार केली होती. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली.

तीन माजी अधिष्ठातांची सोयीची भूमिकाडॉ. कुंभोजकर यांनी २०१८ साली तक्रार केली तर नंतर २७ सप्टेंबर २०२१ रोजी मिरज शासकीय रूग्णालयातील तत्कालीन प्राध्यापक आणि सीपीआरचे अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनीही डॉ. फिरके यांच्याबाबत तक्रार केली. परंतु, २०१८ पासून डॉ. प्रकाश गुरव अधिष्ठाता येईपर्यंत एकाही अधिष्ठाताने या प्रकरणामध्ये ठोस भूमिका घेतली नाही.

तीन अधिष्ठातांनी याबाबतचे अहवालच वरिष्ठांकडे पाठवले नाहीत आणि दोघांनी कोणताही स्वयंस्पष्ट अहवाल न पाठवता मोघम अहवाल पाठवला. या सर्वांना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने पाच वर्षे झाली तरी त्यांच्यावर कारवाई तर झालीच नाही उलट डॉ. दीपा फिरके यांना पदोन्नती दिली गेली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल