शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

'व्होकेशनल'चे रूपांतर नको, 'सक्षमीकरण' करा, मलिक यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 2:44 PM

educationsector, nawab malik, hasan musrif, kolhapurnews कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्होकेशनल शिक्षणाचे रूपांतर नको, सक्षमीकरण करावे अशी आग्रही मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघातर्फे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्दे 'व्होकेशनल'चे रूपांतर नको, 'सक्षमीकरण' करा, मलिक यांना साकडेकोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालकांची मागणी

गडहिंग्लज : कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्होकेशनल शिक्षणाचे रूपांतर नको, सक्षमीकरण करावे अशी आग्रही मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघातर्फे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत मलिक यांची भेट घेतली.राज्यात तीन दशकांपासून यशस्वी सुरू असलेल्या या योजनेचे रूपांतर ऐवजी सक्षमीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक, आमदार रोहित पवार , आमदार राजेश पाटील उपस्थित होते.मलिक म्हणाले, केंद्राच्या धोरणानुसारच या योजनेचे रूपांतर होईल.आमदार काळे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. चर्चेत प्रा.कोरी,माने, डॉ.चव्हाण, आसगांवकर, देसाई यांनीही भाग घेतला.यावेळी कौशल्य शिक्षण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह हेही उपस्थित होते.शिष्टमंडळात गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने,जयंत आसगवकर, सुनील देसाई, डॉ. यशवंत चव्हाण ,उदय पाटील ,विनोद उत्तेकर, सुधाकर कोरवी,डॉ.श्रीकांत हेबाळकर यांचा समावेश होता.मलिक 'रूपांतरा'वर ठाम!कौशल्यावर आधारित फाईव्ह स्टार आय टी आय योजनाच प्रभावी ठरू शकते, शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल .कोणावरही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट करत मंत्री मलिक यांनी आय. टी. आय, व्ही. टी. पी. योजनेचे यावेळी समर्थनच केले.मुश्रीफ शिक्षक, विद्यार्थ्यांच्या पाठीशी!राज्यातील व्होकेशनल शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही, चांगल्या योजनेच्या सक्षमीकरणासाठी आपण संस्था चालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEducation Sectorशिक्षण क्षेत्र