कलाकारांचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण, आश्वासनानंतर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:18 PM2020-10-09T17:18:27+5:302020-10-09T17:35:36+5:30

culture, kolhapurnews, artist, uposhan कोरोनामुळे गेली सहा महिने एकही कार्यक्रम झालेला नाही. घरातील माणसांची पोटं कशी भरायची हा प्रश्न आता समोर आहे. तेव्हा कलाकार मंडळींना दिलासा देण्यासाठी, आमची पोटं भरण्यासाठी काही तरी करा या मागणीसाठी कलापथक निर्माता असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी करवीर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

Do something to fill the stomachs of the artists | कलाकारांचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण, आश्वासनानंतर मागे

कलाकारांचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण, आश्वासनानंतर मागे

Next
ठळक मुद्देकलाकारांचे पोट भरण्यासाठी काही तरी कराकलापथक निर्माता असोसिएशनचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण

कोल्हापूर : कोरोनामुळे गेली सहा महिने एकही कार्यक्रम झालेला नाही. घरातील माणसांची पोटं कशी भरायची हा प्रश्न आता समोर आहे. तेव्हा कलाकार मंडळींना दिलासा देण्यासाठी, आमची पोटं भरण्यासाठी काही तरी करा या मागणीसाठी कलापथक निर्माता असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी करवीर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक राज्यमंत्री  डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आश्वासनानंतर कलापथक असोसिएशनचे उपोषण मागे घेण्यात आले.

सकाळी करवीर तहसिल कार्यालयासमोर शाहीरविशारद डॉ आझाद नायकवडी यांच्या हस्ते नटराज पूजन करून कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्ष शारदा हिलगे, निर्माता रमेश खटावकर, कलाकार संघटनेचे अध्यक्ष विश्वास ढाले हे उपोषणाला बसले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कलापथकातील कलाकार, साउंट सिस्टीम मालक, मंडप मालक, गायक व नाट्यकलाकार, विविध लोककलांमधील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कलापथक असोसिएशनच्या उपोषणाची सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दखल घेतली. त्यांनी सायंकाळी चार वाजता करवीर तहसीलदार कार्यालयासमोर येऊन आंदोलनाला भेट दिली.

कलाकारांच्या सर्व मागण्या यावेळी त्यांनी समक्ष ऐकल्यानंतर कलाकार मंडळींना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.  यावेळी डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर,शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी, कलापथक असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्ष शारदा हिलगे उपस्थित होते.


सहा महिन्यात ना सनई वाजली, ना बेंडबाजा

गेल्या सहा महिन्यात ना सनई वाजली, ढोल, हलगी वाजली. ना बेंडबाजा वाजला. या सगळ्याचा परिणाम आमच्या जगण्यावर झाला आहे. म्हणूनच आता सरकारने आमच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी रेणुका देवीची गाणीही सादर करण्यात आली.

या होत्या मागण्या

करमणुकीच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, चालू शैक्षणिक वर्षाची फी माफ करावी, सर्व कलावंताना तातडीची आर्थिक मदत द्यावी, कलाकारांना लघुउद्योगास विनाअट अनुदान द्यावे, नाममात्र भाड्याने महापालिकेकडील गाळे द्यावेत, वृध्द कलावंत मानधन योजनेतील श्रेणी रद्द करून सरसकट ५ हजार रूपये मानधन द्यावे, कलाकारांच्या घरांचे वीज, पाणी बील माफ करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.

Web Title: Do something to fill the stomachs of the artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.