शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

कोरेगाव भीमा घटनेची उजळणी नको -उत्तम कांबळे कागलमध्ये सामाजिक सलोखा परिषदेतील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:41 IST

कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा

कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा पुन्हा उजळणी करण्याचे टाळूया. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत अशा लाजिरवाण्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी दक्षता घेऊया, अशा भावना सर्वच वक्त्यांनी येथे झालेल्या ‘सामाजिक सलोखा परिषदेत’ व्यक्त केल्या.

येथील गैबी चौकात आरपीआय (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या परिषदेचे आयोजन केले होते. आमदार हसन मुश्रीफ, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, डॉ. अच्युतराव माने, भन्ते एस. संबोधी, आर. आनंद, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आर. पी. आय.चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे होते.

यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जाती, धर्म, विविध भाषा, संस्कृतींचा आपला देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अठरापगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. शाहू-फुले-आंबेडकरांनीही हाच विचार सांगितला. या विचारांमुळेच सामाजिक सलोखा नांदेल. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहूंच्या कोल्हापूरनगरीत जातीयतेला कधी थारा मिळालेला नाही.

कागल तालुक्यात कै. सदाशिव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांनी पुरोगामित्वाचा वारसा जोपासला. कोल्हापुरात आम्ही भारतीय चळवळ लोक आंदोलन पुन्हा सुरू करूया. संजयबाबा घाटगे म्हणाले, पेशवाई नष्ट करण्याचे काम दलित योद्ध्यांनी केले. छ. शिवरायांनी दलितांना शस्त्र हाती घेण्याचा अधिकार दिला होता. हा इतिहास नाकारून चालणार नाही.

कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ सर्व बहुजनांची अस्मिता आहे.समरजितसिंह घाटगे म्हणाले, जो इतिहास घडला आहे तो आपण बदलू शकत नाही. मात्र, इतिहासापासून शिकले पाहिजे. एका कोरेगाव भीमा घटनेनंतर आमच्यात फूट पडावी, एवढे दुबळे संस्कार आमच्यावर झाले आहेत का? इतिहासात झालेल्या चुका वर्तमानात दुरुस्त करूया.

बी. आर. कांबळे यांनी स्वागत, तर बाबासाहेब कागलकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. अच्युतराव माने, प्रा. शहाजी कांबळे, डॉ. अनिल माने, विश्वास देशमुख, मंगलराव माळगे, दगडू भास्कर, सखाराम कामत, बळवंतराव माने, सुभाष देसाई, चंद्रशेखर कोरे, सत्कारमूर्ती उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली.साडेतीन तास चालली परिषदसायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही परिषद साडेदहाला संपली. व्यासपीठाला कै. पांडुरंग सोनुले, भीमराव मोहिते या कार्यकर्त्यांचे नाव दिले होते. उत्तम कांबळे यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. कै. सदाशिवराव मंडलिक, कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील प्रमुख नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली होती.संजय घाटगेंनी मांडला इतिहासया परिषदेत सर्वांत प्रभावी भाषण करीत संजय घाटगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, इंग्रज-पेशवे युद्ध, दलित योद्ध्यांची कामगिरी, असा ओघवता इतिहास मांडला. औरंगजेब आणि पेशव्यांच्या फर्मानाला घाबरून कोणीही पुढे आला नाही; पण दलित समाजातील लोक पुढे आले आणि त्यांनी आमच्या छत्रपतींवर महारवाड्यात अत्यसंस्कार केले. हे मान्य करायला लाज कसली वाटते? असा सवाल करताच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कागल येथे झालेल्या सामाजिक सलोखा परिषदेत उत्तम कांबळे यांचा बुद्धमूर्ती देऊन भन्ते एस. संबोधी, आर. आनंद यांनी सत्कार केला. यावेळी बी. आर. कांबळे, शहाजी कांबळे, समरजित घाटगे, संजय घाटगे, डॉ. अच्युत माने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र