शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धमक्यांना घाबरू नका, पोलीस तुमच्या मदतीला

By admin | Updated: July 27, 2015 00:05 IST

नागरिकांना दिलासा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस करणार प्रबोधन

एकनाथ पाटील - कोल्हापूर -आगामी महापालिका निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये उमेदवारांकडून ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर होण्याची शक्यता आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पोलीस दलाच्या वतीने शहरासह उपनगरांत नागरिकांत जागृती निर्माण करण्यात येणार आहे. सशस्त्र संचलनासह कोणाच्याही दमदाटी, धमक्यांना घाबरू नका, पोलीस चोवीस तास तुमच्या मदतीला आहेत, असा दिलासा नागरिकांना दिला जाणार आहे. महापालिका निवडणूक व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन गेल्या सहा महिन्यांपासून काम करीत आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून त्यामध्ये सर्व स्तरांवर ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर होण्याची शक्यता आहे. मतदार, सार्वजनिक मंडळे, तालीम संस्था, आदींना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा निवडणुकीत सर्रास वापर केला जाण्याची शक्यता आहे. प्रसंगी दमदाटी, धमक्या आणि दहशतीच्या जोरावरही मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी काही उमेदवारांचे आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत. काही उमेदवार सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात असून, याचा परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर होणार असल्याचा इशारा गुप्तहेर विभागाने पोलीस प्रशासनास दिला आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी क्राइम बैठकीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह टोळ्यांंच्या हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देत इच्छुक उमेदवार गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत का, याची गोपनीय माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी पोलीस ठाण्यातील गोपनीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. शहरासह उपनगरांतील हालचालींवर पोलिसांनी ‘विशेष वॉच’ ठेवला आहे. शहर व उपनगरांत सशस्त्र संचलन करून कट्टा बैठका घेण्यात येणार आहेत. मतदानासाठी पैशांचा किंवा भेटवस्तूंचा मोह टाळावा. गुन्हेगारांचा वावर दिसल्यास पोलिसांना माहिती द्या. मतदानासाठी कोणी उमेदवार किंवा गुन्हेगार धमक्या देत असेल किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर घाबरू नका. पोलीस तुमच्या मदतीला चोवीस तास आहेत, असे प्रबोधन करण्यात येणार आहे. १३ टोळ्यांसह २०० गुंडांवर कारवाई आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आर. सी. गँग, एस. टी. गँग, यू. के. ग्रुपसह १३ टोळ्या व २०० पेक्षा जास्त गुंडांचे हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरला लागून असलेल्या सांगली, सातारा, रत्नागिरी व सोलापूर या चार जिल्ह्यांबाहेर त्यांची रवानगी करण्यात यावी, अशी विनंती केली गेली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आपली उचलबांगडी होणार असल्याची चाहूल लागताच बहुतांश गुन्हेगारांनी हद्दपारीच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी पोलीस ठाण्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत फिल्डिंग लावली आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी काही गुन्हेगार सक्रिय आहेत. त्याचबरोबर काही इच्छुक उमेदवारही गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणुकीच्या धर्तीवर कोणाच्याही धमक्यांना घाबरू नका, पोलीस चोवीस तास तुमच्या मदतीला आहेत, असा संदेश नागरिकांना दिला जाणार आहे. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक