शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचा वाद नको, तोडगा काढा

By admin | Updated: October 17, 2014 23:51 IST

कार्यशाळा : शहर आणि ग्रामीण अशा वादाऐवजी सामोपचाराची गरज

कोल्हापूर : एकीकडे हद्दवाढीमुळे ग्रामीण भागातील जनतेवर मोठा अन्याय होईल असे; तर दुसरीकडे हद्दवाढ झाल्यास शहराचा चौफेर विकास होणार असल्याचे चित्र सध्या रंगविले जात आहे. हद्दवाढीमुळे समाविष्ट होणाऱ्या गावांच्या भौगोलिक रचनेबरोबर सांस्कृतिक व सामाजिक ठेवणही लोप पावण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे, तर हद्दवाढ रखडल्याने शहराचा विकासही खुंटल्याची भावना शहरवासीयांत आहे. अशा परिस्थितीत ‘शहर व ग्रामीण’ असा वाद न करता सुसंवादाने विषयावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत महावीर महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत उमटले.शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत महावीर महाविद्यालयात ‘कोल्हापूर शहर : भौगोलिक अभ्यास’ या विषयावर कार्यशाळा गुरुवारी झाली. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. बी. कणसे होते. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहभागी मान्यवरांचे मतहद्दवाढीमुळे ग्रामीण जनतेवर अन्याय होईल, असा गैरसमज आहे. हद्दवाढीमुळे जास्त निधी उपलब्ध होणार आहे. हद्दवाढीमुळे शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणार आहे. समाविष्ट होणाऱ्या गावांना घेऊन जाण्याची हमी शहरवासीयांतर्फे देत आहे. तृप्ती माळवी- महापौर हद्दवाढ न झाल्याने शहराचा विकास खुंटला, हे साफ खोटे आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मोठा विकासनिधी मिळू शकलेला नाही. केंद्र व राज्य सरक ार यांनी संघर्षाशिवाय कोल्हापूरला काहीच दिलेले नाही. लोकसंख्येची अट शिथिल करण्यात राज्यकर्ते कमी पडले. -संपत पवार-पाटील, माजी आमदार शहराची नैसर्गिक व स्वाभाविक वाढ होण्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दवाढीमुळे कृषिक्षेत्राचा नाश होईल, असे म्हणणाऱ्यांचेच अकृषिक किंवा बिगरशेती परवान्यासाठी सर्वाधिक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत. हद्दवाढीमुळे ग्रामीण भागात आरोग्य, पाणी व रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा मिळतील.- अ‍ॅड. बाबा इंदुलकरउदारीकरणामुळे शहरकेंद्रित विकासाची संकल्पना पुढे आली आहे. शहर आणि भांडवलदार यांचा विकास हेच सरकारचे धोरण आहे. हद्दवाढ नफ्यासाठी की गरजेसाठी हा विचार करून सामोपचाराने तोडगा काढणे गरजेचे आहे.- कॉ. चंद्रकांत यादव