माद्याळ येथे सोमलिंग सेवा संस्थेतर्फे लाभांश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:28 IST2021-09-24T04:28:14+5:302021-09-24T04:28:14+5:30

माद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सोमलिंग सेवा संस्थेतर्फे सभासदांना ६ टक्के लाभांश वाटप करण्यात आला. एकूण १ लाख ८२ हजार ...

Dividend distribution by Somling Seva Sanstha at Madyal | माद्याळ येथे सोमलिंग सेवा संस्थेतर्फे लाभांश वाटप

माद्याळ येथे सोमलिंग सेवा संस्थेतर्फे लाभांश वाटप

माद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सोमलिंग सेवा संस्थेतर्फे सभासदांना ६ टक्के लाभांश वाटप करण्यात आला. एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा लाभांश वितरित करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब चौगुले, सोमनाथ घेज्जी, कलगोंडा पाटील, धनाप्पा घेज्जी, शंकर घेज्जी, रमेश चौगुले, गुरगोंडा पाटील, बसाप्पा बेळीकट्टी, मारुती खानापुरे, आण्णासाहेब हेब्बाळे, शंकर कांबळे, अशोक कांबळे, जयवंत कांबळे, बाळासाहेब गवळी उपस्थित होते.

अध्यक्ष मंगल गुरव यांनी स्वागत केले. गडहिंग्लज कारखान्याचे माजी संचालक महाबळेश्वर चौगुले यांनी प्रास्ताविक केले. गुराप्पा घेज्जी यांनी आभार मानले.

फोटो ओळी : माद्याळ (ता. गडहिंग्लज) येथे सोमलिंग सेवा संस्थेच्या अध्यक्ष मंगल गुरव यांच्याहस्ते लाभांश वितरण झाले. यावेळी महाबळेश्वर चाैगुले व संचालक उपस्थित होते.

क्रमांक : २३०९२०२१-गड-०३

Web Title: Dividend distribution by Somling Seva Sanstha at Madyal