शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणजे मुश्रीफ घाबरल्याचा जणू पुरावाच; व्ही.बी.पाटील यांचे प्रत्युतर 

By विश्वास पाटील | Updated: September 9, 2024 19:30 IST

गद्धारी गाडणे यालाच प्राधान्य 

कोल्हापूर : कागलच्या गैबी चौकातील सभेत मी केलेले भाषण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलेच झोंबलेले दिसते. भैया माने यांच्याकडून त्यांनी माझ्यावर केलेली टीका म्हणजे मुश्रीफ घाबरल्याचा जणू पुरावाच असल्याचे प्रत्युतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिले.कागल आणि जिल्हा बँकेचा मला कायमच द्वेष असल्याची टीका मुश्रीफ यांच्या आडून भैय्या माने यांनी करणे म्हणजे सौ चुहे खा के..या प्रकारातील आहे. मुश्रीफ यांना राजकारणात ज्यांनी मोठं केलं त्या शामराव भिवाजी पाटील, विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक आणि आता शरद पवार यांना मुश्रीफ यांनी निव्वळ सत्तेच्या लाभासाठी टांग मारली. मंडलिक यांचे राजकारण संपवायला निघालेल्या या राक्षसी माणसाला कागलच्या जनतेने मंडलिक कारखाना, लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला आहे.तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांची मंडलिक यांच्याशी भेट होऊ नये हे कारस्थान केले होते. ज्यांनी गोकुळच्या निवडणुकीत अंबरीश घाटगे यांना उमेदवारी मिळू नये आणि वीरेंद्र मंडलिक व आमदार राजेश पाटील यांची पत्नी अर्थात मंडलिक साहेबांची कन्या हे दोघे निवडून येऊ नयेत यासाठी सगळी ताकद पणाला लावलीत असे षडयंत्र करणाऱ्याच्या तोंडी कागलच्या हिताची भाषा शोभत नाही. 'या निवडणुकीत तुमचा हिशोब चुकता करणार' ज्यांना तुम्ही माझ्यावर टीका करायला लावली ते भैया माने हे विधानसभा निवडणुकीपर्यंत तुमच्याकडे राहतील काय? हीच शंका आहे. कारण या निवडणुकीत अनेकजण तुमचा हिशोब चुकता करणार आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हा भस्मासूर कागलची जनता यावेळेला नक्कीच गाडणार आहे. राहिला विषय जिल्हा बँकेचा, तिथे आपण काय उद्योग केले आहेत आणि कुणाचे खिसे भरले आहेत याचा पाढा पत्रकार परिषद घेऊन करणार आहे. कारण जिल्हा बँक ही या जिल्ह्यातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांची आधार आहे. ती काय कुणाची खासगी मालमत्ता नव्हे. आज तिचा वापर आपण स्वतःची मालमत्ता असल्यासारखी करत आहात, त्याविरुद्ध मी बोलणार आणि अजून बोलणार आहे असा इशारा व्ही.बी. यांनी दिला.गद्धारी गाडणे यालाच प्राधान्य कोल्हापूर उत्तर विधानसभा बाबतीत नेत्यांनी आदेश दिल्यास व आघाडीने जबाबदारी टाकल्यास लढण्यास तयार आहे.  मी गेले 20 वर्षे सामाजिक कामातून हजारो लोकांची ऋणानुबंध जपले आहेत. त्याची पोचपावती कोल्हापूरची जनता मला निश्चितच देईन.  परंतु ते मला फार महत्त्वाचं नसून भ्रष्टाचार आणि गद्दारी गाडण्यासाठी हे महत्त्वाचं आहे म्हणून कागलची तळागाळातील जनता त्यांचा हिशोब चुकता करणार याचा मला आत्मविश्वास आहे असेही पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफ