उत्तराखंडमधील दुर्घटनेत कोल्हापुरातील कोणी अडकले? शोधासाठी ७० पर्यटन संस्थांशी प्रशासनाने संपर्क साधला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:48 IST2025-08-08T17:47:42+5:302025-08-08T17:48:14+5:30
१६ जण चारधामला जात होते. मात्र..

उत्तराखंडमधील दुर्घटनेत कोल्हापुरातील कोणी अडकले? शोधासाठी ७० पर्यटन संस्थांशी प्रशासनाने संपर्क साधला
कोल्हापूर : उत्तराखंडमधील चारधाममध्ये अतिवृष्टीमुळे मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत कोल्हापुरातील कोणी अडकले आहेत, याच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने ७० पर्यटन करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधला. मात्र दुर्घटनेत कोणीही नसल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.
दुर्घटनेमुळे चारधामला निघालेले बेळगाव, चंदगड तालुक्यातील शिनोळी तालुक्यातील सोळा तरुण ऋषीकेश येथेच थांबले आहेत. त्यांना पुढे जाण्यास परवानगी मिळालेली नाही.
प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात चारधामला पर्यटक मोठ्या संख्येने जातात. गंगोत्री, यमुना, बद्रीनाथ, केदारनाथ या चार धामचे दर्शन घेतला. चारधाम परिसरात मंगळवारी जोरदार पावसामुळे रस्ते, पूल वाहून गेले आहेत. परिणामी तेथे गेलेेले देशभरातील ६० हून अधिक जण पर्यटक अडकले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला आहे.
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
त्यामुळे या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून कोण गेले आहेत का याचा शोध बुधवारपासून सुरू आहे. या दुर्घटनेत जिल्ह्यातील कोणीही नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. बेळगाव, शिनोळीतील १६ जण चारधामला जात होते. मात्र ते वाटेतच आहेत. ते सुखरूपपणे ऋषीकेश येथे मुक्काम केला आहे. त्यांना अजून चारधामला जाण्यासाठी परवानगी मिळालेली नाही.