पूरग्रस्तांना मोफत गणेशमूर्ती वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:05 IST2019-09-02T15:03:30+5:302019-09-02T15:05:38+5:30
सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल्या.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे कोल्हापूर शहर परिसरातील पूरग्रस्तांसाठी मोफत गणेशमूर्ती घरपोच वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाली.
कोल्हापूर : सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल्या.
कोल्हापूरकरांवर ‘न भूतो न भविष्यती’ अशी पूरपरिस्थिती उद्भवली. त्यात अनेकांची घरे, शेती, वित्तहानी झाली. त्यामुळे अशा पूरग्रस्तांना अनेकांनी मदतीचा हात दिला. आज, सोमवारी गणेशाचे आगमन होत आहे. पूरग्रस्त नागरिकांना हा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेकांचे संसार उघडे तर छतच गायब झाले आहे. पुरातून सावरण्यासाठी अजूनही थोडा कालावधी लागणार आहे. ही बाब ओळखून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गणेशमूर्ती घरपोच व मोफत देण्याचा उपक्रम अवलंबला आहे. यावेळी सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आणि देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.