शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अपंग भरतीवरून गदारोळ; सभा तहकूब

By admin | Updated: July 21, 2015 01:04 IST

महापालिकेत वादळी चर्चा : भरती प्रक्रियेसाठी पंधरा दिवसांची प्रशासनाला नोटीस; आयुक्तांचा निषेध

कोल्हापूर : गेली आठ महिने रखडलेली अपंग नोकरभरती येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करा, कुष्ठरोगींना ठरलेले मानधन द्या, अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा देत, सोमवारची महापालिकेची सभा तहकूब करण्यात आली. प्रशासनावर ताशेरे ओढत तीन तास वादळी चर्चा झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या. बोगस दाखल्यावरून अपात्र ठरलेल्या नगरसेवकांमुळे रिक्त झालेल्या स्थायी व परिवहन सदस्यपदी नवीन नेमणूक टाळण्यासाठीच नगरसेवकांनी जाणीवपूर्वक सभा तहकूब केल्याची चर्चा महापालिकेत आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५५ लाख रुपयांची तरतूद करूनही कुष्ठरोगींना दरमहा एक हजार रुपयांचे वेतन दिले जात नाही, तसेच अपंगांसाठीच्या रिक्त जागी अर्ज मागवून आठ महिने उलटले तरी प्रशासनाने पुढील कारवाई केलेली नाही. समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांकडे पाहण्यास प्रशासनास वेळ नाही, अशा संवेदनहीन प्रशासन व आयुक्तांचा निषेध करीत आजची सभा तहकूब करण्याची घोषणा विविध विषयावर मंजुरीसह तीन तासांच्या चर्चेनंतर गटनेता राजेश लाटकर व शारंगधर देशमुख यांनी केली. सुरुवातीस स्थायी, परिवहन व महिला बालकल्याण, परिवहन समिती सदस्य असलेले अनुक्रमे सचिन चव्हाण, रेखा आवळे, दिगंबर फराकटे यांच्या रिक्त जागी नवीन सदस्यांची नेमणुकीचा विषय सभेच्या शेवटी घेण्यात येईल, असे महापौर डकरे यांनी स्पष्ट केले. महापालिका कायद्यानुसार कुष्ठरोगींना सोयी पुरविण्याची तरतूद असूनही त्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासनावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा भूपाल शेटे यांनी दिला. अपंगांसाठी रिक्त जागी एक हजार अर्ज आले, मात्र प्रशासनास याकामी वेळ नाही. सहायक आयुक्त शीला पाटील यांचे याकामी दुर्लक्ष झाले असून, त्यांची चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची मागणी शारंगधर देशमुख यांनी केली. अपंग भरतीची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत राबविण्याची हमी उपायुक्त विजय खोराटे यांनी दिली.