शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तनास दिशा-लक्ष्मीसेन महास्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:10 AM

जयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल.

ठळक मुद्देजयसिंगपुरात मराठी जैन साहित्य संमेलनाची सांगतासमाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल. शहर शताब्दी वर्ष आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदरम्यान झालेला हा सोहळा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर मठाचे प.पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांनी केले. समाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

येथील चौथ्या गल्लीत सोनाबाई इंगळे सभागृहात साहित्य पुरस्कार प्रदान व समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षा लीलावती शहा म्हणाल्या, संमेलन समिती संयोजकांनी संमेलनांचे नेटके आणि यशस्वी नियोजन केले आहे.परिषदेचे मुख्यसचिव डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले, स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्यानंतर खºयाअर्थाने शहर व परिसरात त्यांचे विचार जोपासण्याचे काम त्यांचे पुत्र राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रामाणिकपणे केले आहे.

स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी वसविलेल्या व शताब्दीवर्षात ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीत मराठी जैन साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमींचा ज्ञानोत्सव झाला.

राजेंद्र झेले यांनी स्वागत केले. सचिव प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गजकुमार शहा व अब्दुल रजपूत यांनी मनोगते व्यक्त केली. खासदार राजू शेट्टी यांनी संमेलनाला भेट दिली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले, बी. टी. बेडगे, डॉ. अजित पाटील, सुरेश रेडेकर, विजय आवटी, डॉ. बी. ए. शिखरे, डॉ. सुरेश पाटील, पा. पा. पाटील, अ‍ॅड. धनपाल बेळंके, एम. के. घुमाई, डी. डी. मंडपे, सचिन पाटील, सागर अडगाणे, प्रा. आप्पा भगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद मगदूम यांनी केले. दादासो पाटील-चिंचवाडकर यांनी आभार मानले.पुरस्काराने सन्मानितप्राचार्य गजकुमार शहा यांना साहित्य पुरस्कार, सोलापूरच्या कवयित्री सोनल पाटील यांना रत्नत्रय पुरस्कार, शाहीर कुंतीनाथ करके यांना रत्नाक्का मिरजी साहित्य पुरस्कार, श्रीपाल जर्दे यांना क्रीडा पुरस्कार, विजापूरचे अब्दुल रजपूत यांना जैन शिल्प संरक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.