शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

दहा लाख टनांची प्रत्यक्ष निर्यात । ५० लाख टनांचे लक्ष्य गाठणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:36 PM

देशातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. यातील १० लाख टनांहून अधिक साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागणीपेक्षा जादा साखर झाल्याने निर्यात करून ती कमी करण्यासाठी केंद्राने गेल्या हंगामात २० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. तेही गाठता आले नव्हते.

या हंगामातही केंद्राने कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य दिले आहे. त्यासाठी कारखानानिहाय निर्यात कोटा ठरवून देण्यातआला आहे. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दर २० रुपये प्रतिकिलोच्या आसपासच रेंगाळत आहेत. यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी निर्यातीसाठी वाहतूक अनुदान आणि शेतकऱ्यांच्या निर्यात साखरेवर प्रतिटन थेट अनुदानही सरकारने देऊ केले आहेत. ते मिळाल्यांनरही साखर कारखान्यांना २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल तोटा येत होता. काही दिवसांपूर्वीच केंद्राने साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल २९०० वरून ३१०० रुपये केला आहे. त्यामुळे कारखान्यांचा हा तोटा क्विंटलमागे आणखी २०० रुपयांनी वाढला आहे.

आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार ६ मार्च अखेर कारखान्यांनी २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. १५ लाख ६० हजार ९७७ टन साखर निर्यातीसाठी कारखान्यांतून बाहेर पडली असून, त्यातील १० श्रलाख २६ हजार ६७६ टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली श्रआहे. उर्वरित ५ लाख ३४ हजार ३०१ टन साखर एकतर जहाजांमध्ये किंवा रिफायनरींजमध्ये आहे.बांगला देशाला सर्वाधिक निर्यातबांगला देशाला सर्वाधिक २ लाख ३३ हजार ४२८ टन साखर निर्यात झाली आहे. त्याखालोखाल श्रीलंकेला १ लाख ८४ हजार ४०७ लाख टन निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीत हे प्रमाण अनुक्रमे २०.५ टक्के आणि १५. ८४ टक्के इतके आहे. उर्वरित साखर सोमालिया, सुदान, मलेशियासह अन्य देशांना निर्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने