धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लंपास: शाहूपुरी पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 17:05 IST2020-09-02T17:04:52+5:302020-09-02T17:05:35+5:30

कोल्हापूर : येथील सर्किट हाऊसनजीक एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने चोरून ...

Dhoom style woman's mangalsutra lampas: Complaint lodged with Shahupuri police | धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लंपास: शाहूपुरी पोलिसांत तक्रार

धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लंपास: शाहूपुरी पोलिसांत तक्रार

ठळक मुद्देधूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लंपास सर्किट हाऊसनजीकचा प्रकार: शाहूपुरी पोलिसांत तक्रार

कोल्हापूर : येथील सर्किट हाऊसनजीक एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने चोरून नेण्याचा प्रकार मंगळवारी (दि. १) सायंकाळी घडला. याबाबत ग्रेसी रमण मंडलिक (वय ४८, रा. प्लॉट नं. २८, साई हौसिंग सोसायटी, सर्किट हाऊससमोर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ग्रेसी मंडलिक या महिला दूध आणण्यासाठी चालत जात होत्या. त्याच वेळी समोरून दोन युवक काळसर-मोरपंखी दुचाकीवरून आले. मंडलिक यांच्या गळ्याला हिसडा मारून, गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन धूम स्टाईलने ते कदमवाडीच्या दिशेने पसार झाले. मंडलिक यांनी आरडाओरडा केला; पण चोरटे तोपर्यंत निघून गेले होते. याबाबत ग्रेसी मंडलिक यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चौकट..
चोरट्यांचे वर्णन

काळसर-मोरपंखी दुचाकीवरून दोघे चोरटे आले होते. दुचाकी चालकाच्या अंगावर मरुन लायनिंगचा शर्ट होता, तर मागे बसलेल्या चोरट्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, तर पायांत स्पोर्टस शूज असल्याचे वर्णन फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
(तानाजी पोवार)

Web Title: Dhoom style woman's mangalsutra lampas: Complaint lodged with Shahupuri police