कोल्हापूर : अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांची बदली झाली. त्यांच्या जागी धीरज कुमार बच्चू यांची नियुक्ती झाली. बच्चू हे अमरावती ग्रामीण येथे अपर पोलिस अधीक्षक होते. ते मूळचे तेलंगणाचे असून, २०१९ मधील आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. २०२० मध्ये प्रशिक्षणार्थी कालावधीत ते काही महिने कोल्हापुरात होते. त्यानंतर माजलगाव (जि. बीड) येथे सहायक पोलिस अधीक्षक पदावर त्यांनी काम केले. देसाई यांच्या पदस्थापनेचा आदेश अद्याप आलेला नाही. देसाई यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ जवळपास पूर्ण झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी अपर पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतला होता.
Kolhapur: धीरज कुमार बच्चू नवे अपर पोलिस अधीक्षक, जयश्री देसाई यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:21 IST