शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

माढा लोकसभा मतदारसंघ: नाही गद्दारी, फुंकायची तुतारी; मोहिते-पाटील-निंबाळकरांचं ठरलं 

By पोपट केशव पवार | Updated: March 18, 2024 12:31 IST

सांगोल्याचे अनिकेत देशमुखही चर्चेत

पोपट पवारकोल्हापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागूनही डावलल्याने भाजपवर नाराज असलेले अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील व फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर या दोघांनीही माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातात घेण्याचा अंतिम निर्णय रविवारी घेतला असल्याचे समजते.महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणालाही मिळो, प्रामाणिकपणे एकमेकांना साथ द्यायची, असा शब्द या दोन्ही परिवारांनी एकमेकांना दिला आहे. त्यामुळे 'माढा' मतदारसंघातून शरद पवार यांचे पूर्वाश्रमीचे सवंगडीच भाजपला चीतपट करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकलूजमधील शिवरत्न बझार येथे रविवारी मोहिते-पाटील व नाईक-निंबाळकर बंधूंची बैठक पार पडली. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील व पुरोगामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवीत 'माढा' शेकापला सोडण्याची मागणी केली. भाजपने उमेदवारी नाकारल्याने बंडाच्या पवित्र्यात असलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाविकास आघाडीकडून लढावे यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे. त्यातच रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचेही नाव 'महाविकास'कडून पुढे आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. आता माघार नाही असे सांगत धैर्यशील मोहिते व संजीवराजे या दोघांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत भाजपला आव्हान देण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 'धाडस' दाखवत 'तुतारी' हातात घेतली तर त्यांना मनापासून साथ देऊ असा शब्द नाईक -निंबाळकर बंधूंनी दिला, तर 'माढा'च्या मैदानात संजीवराजे उतरले तर त्यांना त्याच ताकतीने मताधिक्य देण्याची ग्वाही मोहिते-पाटील परिवाराने दिली. इच्छुक धैर्यशील माेहिते व संजीवराजे या दोघांचीही नावे शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात आली असून, दोन दिवसांत यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.सांगोल्याचे अनिकेत देशमुखही चर्चेतमाजी मंत्री स्व. गणतपराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचेही नाव या मतदारसंघातून चर्चिले जात आहे. आमदार जयंत पाटील यांनी तशी जाहीर मागणी केली होती. या बैठकीत अनिकेत देशमुख यांच्याही नावाबाबत चर्चा झाली असून, त्यांचे नाव शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरmadha-acमाढाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार