कोल्हापुरातील जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भक्तांना मारहाण, माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:41 IST2026-03-23T12:41:41+5:302026-03-23T12:41:55+5:30

हुल्लडबाजी करत असल्याचा दावा 

Devotees beaten up by priests at Jyotiba temple in Kolhapur | कोल्हापुरातील जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भक्तांना मारहाण, माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा

कोल्हापुरातील जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भक्तांना मारहाण, माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा

पोर्ले तर्फ ठाणे : परिते गावातील ग्रामस्थ यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर रविवारी सासनकाठी पूजन करायला गेल्यावर, आरतीदरम्यान काही भक्तांनी हुल्लडबाजी करत आरतीमध्ये अडथळा निर्माण केला. यानंतर जोतिबाच्या पुजाऱ्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना मारहाण केली. या प्रकाराने मंदिरात गोंधळ उडाल्याने कोण कोणाला मारतोय हेच कळत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी परितेच्या सरपंचांनी देवस्थानकडे माफीनामा लिहून दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

परिते गावची रविवारी यात्रा असल्याने गावातील मानाच्या सासनकाठीचे जोतिबा मंदिरात पूजन करून गावात आणल्यानंतर तीन दिवसांच्या यात्रेस सुरुवात होते. पारंपरिक प्रथेनुसार रविवारी सकाळी परितेहून पाचशेपेक्षा अधिक ग्रामस्थ जोतिबाला सासनकाठी घेऊन आले होते. दरम्यान, रविवारी सकाळी ११ ते १२ च्या वेळेत मंदिराभोवती आरती सुरू असताना सासनकाठी घेऊन प्रदक्षिणा काढताना भक्तांनी आगाऊपणा करायला सुरुवात केली. पुजाऱ्यांसह देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले. तरीही त्यांनी ऐकून घेतले नसल्याचे देवस्थानचे म्हणणे आहे. 

त्यांनी मंदिरात गोंधळ घातला तसेच आरती करण्यामध्ये अडथळा निर्माण केला. तसेच काही पुजाऱ्यांच्या अंगावर गुलाल फेकणे, टोप्या उडविणे असा हुल्लडबाजपणा सुरू केल्यावर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पुजाऱ्यांनी काही भक्तांना मंदिरातून ओढून मारहाण केली. हाणामारीच्या भीतीने काही भक्त सैरावैरा पळू लागल्यावर त्यांना शोधून मंदिरात आणून चोप देण्याचा प्रकार सुरू झाला.

मंदिराच्या आतील गर्दीत घडणाऱ्या प्रकाराने गोंधळ उडाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी परितेचे सरपंच मनोज पाटील यांनी देवस्थान कमिटीकडे झालेल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून दिल्यानंतर हाणामारीच्या प्रकरणावर पडदा पडला. त्यानंतर सर्व भक्तांना एकत्र करून परतीचा मार्ग धरला.

पारंपरिक पद्धतीने रविवारी परिते गावची यात्रा असल्याने, सुमारे पाचशेवर लोक जोतिबा डोंगरावर सासनकाठी पुजायला घेऊन गेलो होतो. मंदिरात काय घडले याची माहिती नाही; पण तेथील पुजारी आपल्या लोकांना शोधत असल्याची माहिती मिळताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी देवस्थान कमिटीला घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून दिला आणि प्रकरणावर पडदा पाडला. - विजय ऊर्फ मनोज पाटील, सरपंच, परिते

Web Title : कोल्हापुर: ज्योतिबा मंदिर में पुजारियों द्वारा भक्तों से मारपीट; माफी के बाद मामला बंद

Web Summary : ज्योतिबा मंदिर में प्रार्थना बाधित करने पर पुजारियों ने भक्तों के साथ मारपीट की। अनुष्ठानों के दौरान हाथापाई हुई। गांव के मुखिया ने स्थिति को शांत करने के लिए माफी मांगी।

Web Title : Kolhapur: Jyotiba Temple Priests Assault Devotees; Matter Closed After Apology

Web Summary : At Jyotiba Temple, priests assaulted devotees for disrupting prayers. A brawl erupted during the rituals. The village head apologized to defuse the situation.