बसवेश्वर महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य; 'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा' 

By पोपट केशव पवार | Updated: October 20, 2023 17:54 IST2023-10-20T17:54:09+5:302023-10-20T17:54:58+5:30

वीरशैव लिंगायत समाजाची कोल्हापुरात निदर्शने

Derogatory remarks about Basaveshwar Maharaj, File a case against Jitendra Awad | बसवेश्वर महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य; 'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा' 

बसवेश्वर महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य; 'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा' 

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याबदल अवमानकारक वक्तव्य केल्याने वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने शुक्रवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोल्हापुरातील दसरा चौकात निर्दशने करण्यात आली.  आ. आव्हाड यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करून त्वरित कारवाई करावी  अशी मागणी करण्यात आली. यावेळी आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. 

वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे म्हणाले, आमदार आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने देशभरातील आठ कोटी वीरशेव लिंगायत समाज बांधवांच्या बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आपल्या मताच्या राजकारणासाठी शांतताप्रिय वीरशैव लिंगायत समाजाचा उल्लेख किंवा महात्मा बसवेश्वर यांचा उल्लेख केला तर त्यांना त्यांची दाखवून जागा दाखवली जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

Web Title: Derogatory remarks about Basaveshwar Maharaj, File a case against Jitendra Awad