Kolhapur: उपमुख्यमंत्री अजित पवार विश्रामगृहात, अन् घोड्यांनी फोडला पोलिसांना घाम-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:47 IST2025-08-25T15:43:11+5:302025-08-25T15:47:47+5:30
घोड्यांना ताब्यात घेतले

Kolhapur: उपमुख्यमंत्री अजित पवार विश्रामगृहात, अन् घोड्यांनी फोडला पोलिसांना घाम-video
कोल्हापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार आज, सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. सकाळी शासकीय विश्रामगृहात अजित पवारांचे आगमन झाले. दरम्यानच, विश्रामगृहाच्या आवारात दोने घोडे घुसल्याने घोड्यांना हुसकावून लावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
अजितदादा विश्रामगृहात असल्याने याठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. अशातच दोन घोडे विश्रामगृहाच्या आवारात आले अन् इकडून-तिकडे धावत होते. या घटनेने मात्र विश्रामगृहात एकच तारांबळ उडाली.. घोड्यांना हुसकावून लावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. या घोड्यांना ताब्यात घेतले आहे. ही घोडी परिसरात कशी आली याचा आता शोध घेतला जात आहे.