शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Kolhapur: सणात हद्दपार गुन्हेगार परतले, पोलिसांनी चौघांना पुन्हा जेरबंद केले; अनेक आरोपी मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:08 IST

कोल्हापूर : गणपती बाप्पांच्या आगमनासोबतच काही हद्दपार आरोपींनीही आदेशाचा भंग करत जिल्ह्यात प्रवेश केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...

कोल्हापूर : गणपती बाप्पांच्या आगमनासोबतच काही हद्दपार आरोपींनीही आदेशाचा भंग करत जिल्ह्यात प्रवेश केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. हद्दपारीचा भंग केलेल्या अनेक आरोपींनी जिल्ह्यात ठाण मारले असल्याने स्थानिक पोलिस ठाण्यांना कारवाईची मोहीम सुरू करावी लागणार आहे.गंभीर गुन्ह्यांत सहभाग असलेल्या आरोपींवर पोलिस अधीक्षक आणि महसूल अधिका-यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. हद्दपारीच्या काळात आरोपींनी आदेशाचे उल्लंघन करू नये, असे त्यांना पोलिसांकडून बजावले जाते. मात्र, काही आरोपी पोलिसांची नजर चुकवून जिल्ह्यात येतात आणि पुन्हा अवैध धंदे आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होतात. गणेशोत्सव सुरू होताच काही आरोपींचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी हद्दपार आरोपींची धरपकड सुरू केली आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निरंजन वसंत ढोबळे (वय ३६) आणि कुलदीप बाजीराव लांबोरे (४०, दोघे रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांना पद्मावती उद्यान परिसरातून पोलिसांनी अटक केली. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमेश उर्फ गोट्या बबन विटेकर (३०, रा. कनाननगर) याला कनाननगरातून, तर कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकांत शिवाजी दाभाडे (३०, रा. साखरवाडी, कोडोली, ता. पन्हाळा) याला कोडोली बस स्टँड परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर आदेश भंगाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस ठाण्यांचे दुर्लक्ष?स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना दिसणारे आरोपी संबंधित पोलिस ठाण्यांतील पोलिसांना का दिसत नसावेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अनेक हद्दपार आरोपी जिल्ह्यात ठाण मांडून असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस