शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

गारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:46 PM

गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे दुर्मीळ, पावसाळ्यात येणारी विविध प्रकारची वेलवर्गीय, फळवर्गीय पिके

गारगोटी : गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

अतिशय दुर्मीळ असणारी आणि फक्त पावसाळ्यात येणारी ही विविध प्रकारची वेलवर्गीय आणि फळवर्गीय पिके आहेत. यांची चव संशोधित आणि संकरित वाणापेक्षा अविट असते. यामुळे शेती सेवा केंद्रात मिळणाºया बियाण्यांपेक्षा या वाणांना ग्रामीण भागातील शेतकरी अधिक पसंती देतात. काही जातींची वाण आता नष्ट झाली आहेत. काळाच्या ओघात उरलेल्या वाणांना किती दिवस तग मिळतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलणाºया पिकांच्या पद्धतीने भारतीय जनजीवनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. हरितक्रांती करण्याच्या नावाखाली वारेमाप रासायनिक खतांचा वापर करून जमिनींचे आणि पर्यायाने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जुन्या वाणांकडे भारतीय माणसाला वळावे लागणार आहे. त्यामुळेच या बाजारपेठा टिकणे आवश्यक आहे.शेतकरी स्त्रियांनी वर्षभर पारंपरिक पद्धतीने काळजीपूर्वक या बियाण्यांची साठवण केलेली असते. बी-बियाणे विक्रीमुळे थोडाफार आर्थिक लाभ होत असल्याने शेतकरी महिला अशी बियाणी राख, गाडगी, यातून साठवून ठेवतात. केवळ दोन ते तीन आठवडा बाजारात खरेदी-विक्री होते. शेती व परसबागेत पेरणीसाठी ही बियाणी वापरली जात असल्याने खरेदीसाठी शेतकरी व परसबाग करणारे लोक ती खरेदी करतात,तर ज्वारी, वर्णा, मसूर,शेंगदाणे खाण्यासाठी लोक खरेदी करतात.मृग नक्षत्राच्या काळात उपलब्धबाजारात वर्षभर कोणत्याही बी-बियाणे दुकानातून न मिळणारी दुर्मीळ बियाणी फक्त मृग नक्षत्राच्या काळात उपलब्ध होत असल्याने सर्वांना या बिवाळ्या (बियाण्यांची) बाजाराची प्रतीक्षा लागलेली असते. यामध्ये प्रामुख्याने बांधावरची ज्वारी, वरणा, जगदाळे, काटे भेंडी, बावची, मोठा भोपळा, कोहळा, मिरची, दिडका, काकडी, पडवळ, चवाळी, घेवडा, देशी शेंगदाणे, तोंदली, वाळकी, तुरा जोंधळा, तूर, हळदीचे, आल्याचे गड्डे, अशी पारंपरिक बियाणी उपलब्ध होतात. 

भारतीय कृषी संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांची येथे लागवड केली जात आहे; पण जादा उत्पन्न मिळवण्यासाठी सुधारित आणि संकरित बी-बियाणे वापरण्याकडे शेतकरी वळला असल्यामुळे काही बियाणांच्या जाती नष्ट होत आहेत. पावसाळ्यात बांधावर आणि शेतात येणाºया पिकांची चव जिभेवर रेंगाळते. ही बियाणी शासनाने जतन करणे आवश्यक आहे, अन्यथा काळाच्या ओघात ती पडद्याआड होतील.- सात्तापा पाटील (कृषितज्ज्ञ, म्हसवे, ता. भुदरगड)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार