शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ४१० कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:07 IST

एक हजार कोटींच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी

कोल्हापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते विकास अशा सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय नियाेजन समितीच्या बैठकीत अतिरिक्त ४१० कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. शासनाकडून मान्यता आलेले ५३७.२० काेटी, अतिरिक्त ४१० कोटी, विशेष घटक योजनांसाठी १४३.८४ कोटी अशा १ हजार ०९३ काेटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत याचे सादरीकरण केले जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, नियोजन उपायुक्त संजय मरकळे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते. तत्पूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंजूर निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करा, ज्या विभागांना अतिरिक्त निधीची गरज आहे त्यांनी प्रस्ताव द्यावेत, मंदिर विकास आराखडे, शाहू स्मारक व केएमटी बसेससाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले. यावेळी अंबाबाई व जोतिबा विकास आराखड्यांचे सादरीकरण झाले.

आतापर्यंत ४० टक्के खर्चसलग निवडणुका, आचारसंहितेमुळे चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीचा ७६४.६२ कोटींपैकी आतापर्यंत फक्त ३०७.५७ कोटींचा ४० टक्के निधी खर्च झाला आहे. पुढील दीड महिन्यात ४५७ काेटींचा निधी खर्च करावा लागणार आहे. यातील ९७ टक्के कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे निधी परत जाणार नाही, असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

आर्थिक वर्षातील महत्त्वाची कामे व निधी

  • जिल्हा परिषदेच्या २१३ शाळा समृद्ध करण्यासाठी ६४ कोटी
  • जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ११.७९ कोटींचा निधी, पुढील वर्षी ४० आरोग्य केंद्रांसाठी १६ कोटी
  • मिशन विद्या किरण या ४०६ शाळामंधील सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४.५७ कोटी, पुढील वर्षी ३९८ शाळांना ५ कोटी
  • १५९ शासकीय कार्यालयांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६.३७ कोटी
  • शाहू स्मारक भवन नूतनीकरणासाठी ६.३७ कोटी
  • छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथील जलतरण तलाव नूतनीकरणासाठी ८१.११ लाख
  • किल्ले भुदरगड येथे पर्यटन सुविधा १.२० कोटी-वन पर्यटन सुविधांसाठी १७.४९ कोटी
  • शिंगणापूर येथील शाहू छत्रपती क्रीडा प्रशालेसाठी ३.९५ कोटी
  • विभागीय क्रीडा संकुल संरक्षक भिंतीसाठी २ कोटी
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur District seeks ₹410 Crore for Comprehensive Development Initiatives

Web Summary : Kolhapur district administration demands additional ₹410 crore for development in primary schools, infrastructure, and rural roads. A ₹1,093 crore annual plan has been approved, prioritizing education and infrastructure projects. Focus on timely fund utilization and key initiatives like school upgrades and healthcare improvements.