शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

..तरी शरद पवार यांची भीती का वाटते, जाणीवपूर्वक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:56 IST

मोठा विजय मिळूनही पवार यांची भीती का वाटते

कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांना शरद पवार यांचा मोठा आधार होता. त्यांनी एफआरपी, इन्कमटॅक्ससह अनेक प्रश्ननांवर तोडगा काढण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या मनात पवार यांच्याविषयी आदराची भावना आहे. मात्र, सध्याच्या स्थितीला त्यांची ही प्रतिमा जाणीवपूर्वक डागळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागला नाही. सध्या मात्र, कृषिमंत्री कोण आहे याची अनेकांना माहिती नाही. पवार यांना वारंवार जेवढे टार्गेट केले जात आहे. मात्र, जितके टार्गेट कराल तेवढे त्यांच्यासोबत मराठी माणूस एकत्र येईल. इतका मोठा विजय मिळूनही पवार यांची भीती का वाटते, असा सवालही त्यांनी केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार उपस्थित होते.

सवलतीच्या पैशाच्या वसुलीसाठीच दरवाढएस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली, पण या सवलतीचे पैसे भाड्यात वाढ करून सरकारने भरपाई सुरू केली असून, दरवाढ न करता तिजोरीतून हे पैसे द्यावेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

गुंतवणूक कागदारवर राहू नयेदावोसमध्ये मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी राज्यासाठी १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे, याचे स्वागत करतो. हे सर्व भारतातीलच गुंतवणूकदार आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर कारखाने सुरू करावेत व बेरोजगार युवकांना संधी द्यावी. ही गुंतवणूक कागदावरच राहू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बदली होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणारपक्षात काही बदलाचे वारे सुरू आहे, हे मला माहीत नाही. मात्र, बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला बदल होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करायचे असते. मी बदलीच्या प्रतीक्षेत नाही, ज्यावेळी बदली होईल, त्यावेळी बघू असे सांगत तूर्तास प्रदेशाध्यक्षपद बदलणार नसल्याचे संकेत आमदार पाटील यांनी दिले.सहपालकमंत्रिपदाला अर्थ नाहीशक्तीपीठ महामार्गात छोटे शेतकरी भरडले जाणार असल्याने महामार्गाला लोकांचा विरोध आहे. सहपालकमंत्री हे पदच नाही. भाजपचा आग्रह असल्याने ही पदे भरली असली तरी त्याला काही अर्थ नसल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुतीBJPभाजपा