सरकारच्या दिरंगाईने स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:52 IST2020-09-29T14:51:18+5:302020-09-29T14:52:54+5:30
आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने कोणत्या प्रवर्गातून परीक्षा द्यायची याबाबत मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत मराठा विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे यांना भेटणार आहे.

सरकारच्या दिरंगाईने स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
कोल्हापूर : आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने कोणत्या प्रवर्गातून परीक्षा द्यायची याबाबत मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत मराठा विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे यांना भेटणार आहे.
एमपीएससीची परीक्षा दि. ११ ऑक्टोबरला होणार आहे. ही परीक्षा एसईबीसी, ईडब्ल्यूएस की, खुला प्रवर्गातून द्यायची याबाबत काही स्पष्ट माहिती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्याबाबत राज्य शासनाने एमपीएससीला अद्याप काहीच निर्णय सांगितलेला नाही.
मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातून, जर ईडब्ल्यूएसमध्ये समाविष्ट केले, तर कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होईल. या परीक्षेसाठी राज्यातून पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यातील सुमारे दीड लाख विद्यार्थी हे एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी परिषदेची असल्याची माहिती विश्वंभर भोपळे आणि सारिका भोसले यांनी पत्रकाव्दारे सोमवारी दिली.