शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

#VidhanSabha2019 : दलबदलूंची वाट बिकटच..., युतीचा धर्म पाळण्यासाठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:36 AM

सत्तेचा लंबक भाजप-शिवसेनेकडे झुकल्याने आघाडी सरकारच्या काळात सत्तेचे वाटेकरी बनलेल्या राज्यातील अनेक आजी-माजी आमदारांनी भाजप-शिवसेनेची वाट धरली आहे.

- पोपट पवार कोल्हापूर : सत्तेचा लंबक भाजप-शिवसेनेकडे झुकल्याने आघाडी सरकारच्या काळात सत्तेचे वाटेकरी बनलेल्या राज्यातील अनेक आजी-माजी आमदारांनी भाजप-शिवसेनेची वाट धरली आहे. मात्र, या ‘आयाराम-गयाराम’ नेत्यांची विधानसभेची वाट अडविण्यासाठी विरोधी पक्षांसोबतच स्वपक्षातील बंडखोरांनी मैदानात उतरण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेने इनकमिंग केलेल्या या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत खडतर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे, अनेक मतदारसंघांत या दलबदलू आजी-माजी आमदारांच्या समर्थकांनीच त्यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याचे संकेत दिल्याने पक्ष बदलणारे नेते खिंडीत सापडले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेले सातारचे शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला असला तरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनेही त्यांच्या विरोधात तोडीस-तोड उमेदवार देण्याची तयारी सुरू केली केल्याने शिवेंद्रराजे चिंतेत आहेत. येथे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे किंवा त्यांचे पुत्र तेजस शिंदे यांचे आव्हान शिवेंद्रराजेंना पेलावे लागणार आहे.एकेकाळी ‘पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक’ असणारे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकीची हाक दिली आहे. येथे प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई अशा एकास एक मातब्बर इच्छुकांनी गोरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. गोरे यांचा प्रवेश निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना रूचला नसल्याने त्यांनी उघडपणे बंडाची भाषा सुरू केल्याने गोरे यांची अडचण होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सत्तेची फळे चाखणाºया बीडच्या जयदत्त श्रीरसागर यांनी ‘शिवबंधन’ बांधत पुन्हा सत्तेत जाण्याचे स्वप्न पाहिले असले तरी त्यांना भाऊबंदकीचा टोकाचा सामना करावा लागणार आहे. पुतणे संदीप क्षीरसागर यांनीच काकांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकाविले आहे.महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांसोबत हार-तुºयात गुंफूनही भाजपने ‘वेटिंग लिस्ट’मध्ये टाकल्याने रातोरात ‘मातोश्री’ गाठणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेसकडून प्रभाकर पालोदकर तर भाजपकडून माजी आमदार सांडू पाटील-लोखंडे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे, अशोक गरुड आणि किरण जैस्वाल यांनी लढण्याची तयारी केली आहे.राष्ट्रवादीशी रक्ताचे नाते सांगणाºया उस्मानाबादच्या राणा जगजितसिंह पाटील यांनीही पवारांची साथ सोडत भाजपशी नाते जोडले आहे. मात्र, राणा पाटील यांच्याच विरोधात त्यांच्याच तेर गावच्या, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आक्रमक वक्तृत्वामुळे राज्यभर लोकप्रिय असलेल्या सलगर यांची उमेदवारी उस्मानाबादच्या पाटील कुटुंबीयांसाठी धोक्याची ठरू शकते.भगवंत नगरी बार्शीतही राष्ट्रवादीच्या दिलीप सोपल यांनी बदलती हवा पाहून ‘मातोश्री’ची पायरी चढली असली तरी येथे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू, भाजपचे राजेंद्र राऊत यांच्याशी त्यांना उभा संघर्ष करावा लागणार आहे. येथे शिवसेनेच्या भाऊसाहेब आंधळकर यांनीही सोपलांना पाडण्यासाठी कंबर कसल्याने सोपल चक्रव्युहात अडकले आहेत. राष्ट्रवादीकडून येथे वैरागचे निरंजन भूमकर, मकरंद निंबाळकर यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही शिवबंधन बांधले आहे. मात्र, नमनालाच स्थानिक शिवसैनिकांनी त्यांना विरोध दर्शविल्याने कांबळेची गोची झाली आहे.>नवी मुंबईत मंदा म्हात्रेंचे काय..?‘शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी’ असा प्रवास करणाºया नवी मुंबईतील नाईक परिवारालाही पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपल्या समर्थकांशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे. एकीकडे गणेश नाईक यांना भाजपमध्ये घेताना भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या राजकीय कारकीर्दीवर मात्र, भाजपने जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे. त्यामुळे नवी मुंबईत म्हात्रेंचे बंड झाल्यास नवल वाटू नये, अशी स्थिती आहे....तर गावितांनाही झगडावे लागेलदोनवेळा इगतपुरी मतदारसंघांतून काँग्रेसकडून विधानसभा गाठणाºया निर्मला गावित यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आहे. मात्र, येथे सेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळेमेंगाळ यांनी बंड केल्यास गावितांना विजयासाठीझगडावे लागेल.बहिणीशीच करावा लागेल सामनाश्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार राहिलेल्या अवधूत तटकरे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, अवधूत तटकरे यांना त्यांची चुलत बहीण आदिती तटकरे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या असलेल्या आदिती यांनी या मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी शिवसेनेत उडी घेतली असली तरी त्यांचे चुलतबंधू भास्कर बरोरा यांनीच राष्ट्रवादीकडून लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येथे भाऊबंदकीचा सामना रंगणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा