प्रेमप्रकरणातून दीर भावजयची आत्महत्या

By admin | Published: November 14, 2016 04:56 PM2016-11-14T16:56:43+5:302016-11-14T16:56:43+5:30

प्रेमप्रकरणातून दीर व भावजय यांनी आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली

Deer Bhavjai's suicide by love affair | प्रेमप्रकरणातून दीर भावजयची आत्महत्या

प्रेमप्रकरणातून दीर भावजयची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत

 कोल्हापूर, दि. १४ -  प्रेमप्रकरणातून दीर व भावजय यांनी आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. रंकाळ्यानजीकच्या खणीत या दोघांचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेचा उलघडा झाला.

 स्वाती सुनील सणगर (वय ३७) रा. कागल व विकास राजेंद्र राऊत (वय ३०,रा. यादवनगर)अशी मृतांची नावे आहेत. रंगाळ्यानजीकच्या  खणीत सोमवारी सकाळी या दोघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. यानंतर या घटनेचा उलघडा झाला. स्वाती व विकास यांचे प्रेमसंबंध होते, यातूनच त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा कयास आहे. आत्महत्या करताना दोघांचेही हात बांधलेले होते.

घटनास्थळी जुना राजवाडा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.  

Web Title: Deer Bhavjai's suicide by love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.