शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या साखरेस निर्यात अनुदानाचा निर्णय

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

चार हजार अनुदान : देशातून १४ लाख टन निर्यात

कोल्हापूर : केंद्र सरकारने गुरुवारी आणखी चौदा लाख टन कच्ची साखर निर्यातीस मंजुरी दिल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठेत साखरेचे दर वाढण्यास काही प्रमाणात उपयोग होणार आहे परंतु त्याबद्दल साखर कारखानदारीतून ‘दात टोकरून पोट भरत नाही..’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. केंद्र शासनाने अनुदानाची घोषणा केली असून त्याचा अधिकृत अध्यादेश निघण्यासाठी कांही दिवसांचा अवधी लागू शकतो.केंद्र सरकारने कच्ची साखर निर्यात करण्यासाठी टनास चार हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. यापुढील काळात जे कारखाने कच्ची साखर तयार करतील व जे पहिल्यांदा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करतील त्यांनाच या अनुदानाचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे कारखानदारीस या निर्णयाचा तातडीने काही लाभ होणार नाही परंतु देशांतर्गत बाजारातील साखर निर्यात होणार म्हटल्यावर स्थानिक बाजारपेठेत साखरेचे दर काही प्रमाणात वाढू शकतात. सध्या साखरेचा क्विंटलचा दर २४०० रुपयांपर्यंत आला आहे. साखर विकून जे पैसे उपलब्ध होतील, त्यानुसार कारखाने एफआरपी देण्याचा प्रयत्न करत आहेत. कायद्याने चौदा दिवसांत बिले देण्याचे बंधन असतानाही दोन बिले एकत्र करून शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांना ठोस अनुदान दिल्याशिवाय कित्येक कारखान्यांना ‘एफआरपी’ही देता येणार नाही परंतु त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा होता. त्या पातळीवर सगळे ठप्प आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रघुनाथदादा पाटील यांची संघटनाही सुरुवातीच्या टप्प्यात आंदोलन करून थकली आहे. राज्य शासन दादच द्यायला तयार नाही. स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला असल्याने राज्यातही ते त्यांच्यासोबतच असल्याने धड आंदोलन करता येत नाही व दरही मिळवता येत नाही, अशी कोंडी त्यांची झाली आहे.